Ishan Kishan : IPL मुळे इशान किशनने टीम इंडियाची साथ सोडली? 'या' खेळाडूच्या आरोपाने उडाली खळबळ

ishan kishan left Team India because of IPL 2024 pakistan cricketer kamran akmal questions India wicketkeeper cricket news marathi
ishan kishan left Team India because of IPL 2024 pakistan cricketer kamran akmal questions India wicketkeeper cricket news marathi sakal

इशान किशन सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेत आहे. भारताच्या यष्टीरक्षक फलंदाजाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेतून आपले नाव काढून घेत चर्चेत आला होता. वास्तविक, इशान किशनने 'मानसिक थकवा'चे कारण देत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते, ज्यावर आता पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमलने मोठे विधान केले आहे.

ishan kishan left Team India because of IPL 2024 pakistan cricketer kamran akmal questions India wicketkeeper cricket news marathi
Sumit Nagal Australian Open 2024: सुम‍ितने ऑस्ट्रेल‍ियन ओपनमध्ये रचला इत‍िहास! 1989 नंतर ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

खरंतर, इशान किशन आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा एक भाग आहे. आगामी हंगामात तो संघासोबत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे त्याने दोन महिन्यांच्या या टी-20 लीगचे दडपण सहन करण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून आपले नाव मागे घेतले. असा दावा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने केला आहे.

ishan kishan left Team India because of IPL 2024 pakistan cricketer kamran akmal questions India wicketkeeper cricket news marathi
Ind Vs Afg : संजू सॅमसनची एन्ट्री पक्की; तिसऱ्या टी-20 सामन्यात संघात होणार बदल, कोण जाणार बाहेर?

अकमल म्हणाला की, 'भारतीय संघात खेळणे ही मोठी गोष्ट आहे. पण तू (इशान किशन) आयपीएलमध्ये दोन महिने खेळण्यासाठी स्वत:ला तयार करत आहे. मानसिक थकव्याचे निमित्त माझ्या समजण्यापलीकडचे आहे. मला वाटते की निवड समितीने त्याला संघातून काढून योग्य काम केले आहे. आता त्याला विश्रांती द्या आणि मग त्याने आपले स्थान निर्माण करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे. हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, मानसिक थकवा आल्याने तुम्ही अशी विश्रांती मागू शकत नाही.

अकमल पुढे म्हणाला, 'तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर मानसिक थकवा आल्याने तुम्ही विश्रांती कशी घेऊ शकता. या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराहसारखे खेळाडूही आहेत. हे खेळाडू आयपीएल खेळतात आणि आंतरराष्ट्रीय सामनेही खेळतात ज्यात त्यांचा कसोटी संघात समावेश होतो. या कारणासाठी खेळाडूंनी ब्रेक घेतल्याचे मी कधीच ऐकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com