INDvsNZ : 'जस्सी पाजी...ये क्या हुआ '; बुमरा पहिल्यांदाच विकेटलेस!

टीम ई-सकाळ
Tuesday, 11 February 2020

२१ फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्धची टेस्ट सीरिज सुरू होणार आहे. यामध्ये तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष्य राहणार आहे.

INDvsNZ : माउंट मौंगानुई : टीम इंडियाचा जसप्रीत बुमरा याची गणना सध्याच्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. पण, न्यूझीलंड विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही, या गोष्टीची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बुमरा सध्या वनडे क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. पण त्याला द्विपक्षीय मालिकेत एकही विकेट न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्याचा या कामगिरीचा त्याच्या चाहत्यांनाच नव्हे, तर टीम इंडियाच्या सगळ्या फॅन्सना धक्का बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. 

- INDvsNZ : ३१ वर्षांनंतर टीम इंडियावर आली 'अशी' वेळ!

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये बुमराची कामगिरी 

पाठीच्या दुखापतीतून जानेवारीमध्ये पुनरागमन केल्यावर सलग चौथ्या एकदिवसीय सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने एकूण 30 ओव्हर बॉलिंग करताना एकही विकेट घेतली नाही. याबदल्यात त्याने 167 रन्सची खैरात न्यूझीलंडला दिली आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्याने फक्त एक मेडन ओव्हर टाकली आहे. भारताला व्हाईटवॉश मिळण्यामध्येही बुमराचे अपयश हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. 

- 'नो बॉल' संदर्भात आयसीसीचा मोठा निर्णय; वर्ल्डकपपासून होणार अंमलबजावणी!

गेल्या काही मॅचमधील बुमराची कामगिरी :

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 

पहिली वनडे - ७-०-५०-० (मुंबई)

दुसरी वनडे - ९.१-२-३२-१ (राजकोट) 

तिसरी वनडे - १०-०-३८-० (बेंगलोर)

भारत विरुद्ध न्यूझीलंड :

पहिली वनडे - १०-१-५३-० (हॅमिल्टन) 

दुसरी वनडे - १०-०-६४-० (ऑकलंड)

तिसरी वनडे - १०-०-५०-० (बे ओव्हल) 

- U19CWC Final : विजयाचा उन्माद बांगलादेशच्या अंगलट; खेळाडूंना भोगावी लागणार फळं!

दरम्यान, २१ फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्धची टेस्ट सीरिज सुरू होणार आहे. यामध्ये तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष्य राहणार आहे. कारण आगामी ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा पार पडणार आहे. यादृष्टीने टीम इंडिया आपली कामगिरी उंचावण्यावर भर देईल, अशी आशा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jasprit Bumrah goes wicketless in ODI as India receive whitewash from New Zealand