INDvsNZ : ३१ वर्षांनंतर टीम इंडियावर आली 'अशी' वेळ!

Team-India-Whitewash
Team-India-Whitewash

INDvsNZ : माउंट मौंगानुई : येथे आज झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे मॅचमध्ये भारताचा पराभव करत यजमान न्यूझीलंजने टी-२० सीरिजमधील पराभवाची परतफेड केली. 

न्यूझीलंडने वनडे सीरिज ३-० ने जिंकत टी-२० सीरिजमध्ये ५-० ने झालेल्या पराभवाचे उट्टे काढले. मात्र, एकही वनडे मॅच न जिंकता आल्याचे दु:ख पचवत असताना टीम इंडियाच्या खेळाडूंना आपले तोंड लपवण्याची वेळ आली आहे. कारण तब्बल ३१ वर्षांनंतर वनडेमध्ये टीम इंडियाला व्हाईटवॉश स्वीकारावा लागला आहे. 

तीन किंवा त्यापेक्षा जास्त मॅच असणाऱ्या वनडे सीरिजमध्ये आतापर्यंत टीम इंडियाने तिसऱ्यांदा व्हाईटवॉश स्वीकाराला आहे. यापूर्वी  १९८३-८४ आणि १९८८-८९ मध्ये वेस्ट इंडिजने भारताचा ५-० असा फडशा पाडला होता. त्यानंतर आता न्यूझीलंडने टीम इंडियाला ३-०ने पराभूत केले आहे. 

२००६-०७मध्ये टीम इंडियावर अशी वेळ आली होती. तेव्हा साउथ आफ्रिकेने भारताचा ४-० असा पराभव केला होता, पण या सीरिजमधील एक मॅच ड्रॉ झाली होती. तसेच १९९७ साली श्रीलंकेविरुद्ध ३-० ने भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळीही एक मॅच ड्रॉ करण्यात आली होती. त्यानंतर २०१३-१४ मध्ये आफ्रिकेविरुद्धच तिसरी मॅच ड्रॉ झाल्यामुळे टीम इंडियाने २-० असा पराभव स्वीकारला होता. 

दरम्यान, आजच्या मॅचमध्ये गुप्टील (६६) आणि निकोलस (८०) या जोडीने १०६ रन्सची सलामी दिली. त्यानंतर मधल्या फळीतील बॅट्समन टीम इंडियाच्या माऱ्यासमोर टिकाव धरू शकले नाहीत. पण टॉम लॅथम आणि कॉलिन डी-ग्रँडहोमने शेवटी केलेल्या टोलेबाजीमुळे टीम इंडियाचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले. लॅथमने ३२ तर ग्रँडहोमने ५८ रन्स करत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

टीम इंडियातर्फे युझवेंद्र चहलने ३ तर रविंद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या. टी-२० मधील निर्भेळ यश आणि वनडेतील मानहानीकारक पराभव यातून धडा घेत टीम इंडिया आगामी टेस्ट सीरिजच्या तयारीला लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com