esakal | ICC ODI Ranking : बुमराची घसरण तर ‘सर जडेजा’ चमकले!
sakal

बोलून बातमी शोधा

Team-India-ICC-ODI-Ranking

वनडे सीरिजमध्ये के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा यांनी आपली छाप सोडली. जडेजाने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डींगमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

ICC ODI Ranking : बुमराची घसरण तर ‘सर जडेजा’ चमकले!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

टीम इंंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. कॅप्टन विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० सीरिज ५-०ने जिंकत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. मात्र, हा आनंद जास्त वेळ राहिला नाही. कारण वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाला किवीजकडून ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुखापतीमुळे रोहित शर्माला बाहेर बसावे लागले. आणि कॅप्टन विराट कोहलीही आपल्या बॅटमधून धावांची बरसात करू शकला नसला तरी त्यांचं वनडेच्या वर्ल्ड रँकिंगवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे विराट आणि रोहित अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी कायम आहेत.

दुसरीकडे किवीजच्या रॉस टेलरने एका स्थानाने बढती मिळवली आहे. आता तो चौथ्या स्थानी पोहोचला आहे. दुखापतीमुळे किवीज कॅप्टन केन विल्यमसन पहिल्या दोन वनडे मॅच खेळू शकला नाही. त्यामुळे त्याच्या रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. 

- 'नो बॉल' संदर्भात आयसीसीचा मोठा निर्णय; वर्ल्डकपपासून होणार अंमलबजावणी!

न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये भारताला व्हाईटवॉश मिळण्यास जसप्रीत बुमराचं अपयश कारणीभूत असल्याचं अनेकजणांचं म्हणणं आहे. कारण तीन मॅचमध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही. याचा परिणाम त्याच्या रँकिंगवर दिसून आला. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने बुमराला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. बुमराची आता दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. 

- INDvsNZ : 'जस्सी पाजी...ये क्या हुआ '; बुमरा पहिल्यांदाच विकेटलेस!

वनडे सीरिजमध्ये के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा यांनी आपली छाप सोडली. जडेजाने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डींगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत त्याने तीन स्थानांची झेप घेत सातवे स्थान काबीज केले आहे. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने इंग्लंडच्या बेन स्टोक्सला मागे टाकत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे.

- ऑस्ट्रेलियाचा 'हा' धडाकेबाज फलंदाज होणार टी-20मधून निवृत्त?

दरम्यान, टी-२० सीरिजमध्ये न्यूझीलंडला ५-०ने व्हाईटवॉश देत टीम इंडियाने परदेश दौऱ्याची धडाक्यात सुरवात केली होती. पण न्यूझीलंडने वनडे सीरिज ३-०ने जिंकत याची सव्याज परतफेड केली. यानंतर टीम इंडिया आणि किवीजमध्ये दोन टेस्ट मॅचची सीरिज होणार असून यामध्ये आता कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष्य लागून राहिले आहे.