जसप्रीत बुमराहने बायको सोबत रस्त्यावरच सुरू केलेला रोमान्स; फोटो व्हायरल

भल्या भल्या फलंदाजांना खुन्नस देणारा बुमराहने रस्त्यावरच सुरू केलेला रोमान्स
jasprit bumrah shares romantic photo with wife sanjana ganesan sports cricket
jasprit bumrah shares romantic photo with wife sanjana ganesan sports cricket sakal

एन्जॉय करत आहेJasprit Bumrah Wife Sanjana Ganesan : वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात असून भारताने पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर, दुसरा सामना आज खेळला जाणार आहे. विंडीजविरुद्ध मालिकेत विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह ज्यामुळं त्याची बायको संजना गणेशनसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. नुकतंच जसप्रीत बुमराहनं त्याची पत्नीसोबतचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

jasprit bumrah shares romantic photo with wife sanjana ganesan sports cricket
WI vs IND : संघाच्या लगेजचा झाला लोचा! दुसरा टी 20 सामना उशिरा होणार सुरू

जसप्रीत बुमराहनं त्याच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून संजनासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोला त्याने 'बेटर टुगेदर, एव्हरी स्टेप ऑफ द वे' असे कॅप्शन दिले आहे. जसप्रीत बुमराहच्या या पोस्टला आतापर्यंत 37.7 हजाराहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे. चाहते बुमराहच्या फोटोचं कौतुकही करताना दिसत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, जसप्रीत बुमराहने बायको सोबत रस्त्यावरच रोमान्स सुरू केलेला वाटतं.

jasprit bumrah shares romantic photo with wife sanjana ganesan sports cricket
WI Vs IND : रोहित शर्मा 26 वर्षाच्या अष्टपैलूसाठी श्रेयस अय्यरला देणार का डच्चू?

भारतीय क्रिकेट संघाचा जसप्रीत बुमराहला कणा मानला जातो. त्यानं आपल्या कारकिर्दीत दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताला बऱ्याच सामन्यात विजय मिळवून दिला आहे. त्यानं भारतासाठी आतापर्यंत 72 एकदिवसीय सामने खेळले असून ज्यात 121 विकेट्स घेतल्या आहेत. तर 58 टी-20 सामन्यात 69 विकेट्स घेतले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 128 विकेट्सची नोंद आहे. जसप्रीत बुमराह आगामी काळात अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com