Jay Shah : जय शाह देणार राजीनामा? क्रिकेटमधील सर्वोच्च खुर्चीवर नजर, लवकरच लढवणार निवडणूक?

आशियाई क्रिकेट परिषदेची (ACC) वार्षिक सर्वसाधारण सभा आज होणार आहे.
Jay Shah news in marathi
Jay Shah news in marathisakal

Jay Shah News : आशियाई क्रिकेट परिषदेची (ACC) वार्षिक सर्वसाधारण सभा आज होणार आहे. ही बैठक इंडोनेशियातील बाली येथे होणार आहे. या बैठकीत एसीसी अध्यक्ष जय शाह मोठा निर्णय घेऊ शकतात. ते आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात. रणनीतीचा भाग म्हणून जय शाह हा निर्णय घेऊ शकतात.

खरंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) निवडणुका या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. अशा परिस्थितीत जय शाह आयसीसी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा विचार करू शकतात. त्यामुळे आज होणाऱ्या एसीसीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. ही बैठक 2 दिवस (30-31 जानेवारी) चालेल ज्यामध्ये आशियातील सर्व क्रिकेट बोर्ड सदस्य सहभागी होतील.

Jay Shah news in marathi
Cheteshwar Pujara : दुखापतीशी झुंज देत पुजाराची रणजीमध्ये तुफानी खेळी! BCCI निवड समितीला विचार करण्यास पाडले भाग

जय शाह सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (BCCI) सचिव पदावर कार्यरत आहेत. दुसरीकडे, ते एसीसीचे अध्यक्ष म्हणून ही कार्यरत आहेत. तर ACC मध्ये अध्यक्षपदासाठी दर 2 वर्षांनी निवडणुका होतात. म्हणजेच जय शाह यांच्या कार्यकाळात अजून एक वर्ष बाकी आहे.

पण आयसीसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय शाह मोठा निर्णय घेऊ शकतात आणि एक वर्षापूर्वी एसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात. मात्र, जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदाचा राजीनामा कधी देणार, राजीनामा देणार की नाही? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Jay Shah news in marathi
Rishabh Pant :'त्या क्षणाला काय वाटलं?', भीषण कार अपघाताबद्दल पहिल्यांदाच बोलला ऋषभ पंत

एसीसीच्या बैठकीत प्रसारण हक्कांबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. या अंतर्गत आशिया कप ही देखील मोठी स्पर्धा आहे. ACC च्या प्रसारण अधिकारांमध्ये अंडर-23, अंडर-19 आणि महिला आशिया कप यांचाही समावेश असेल. सध्या, स्टारकडे टीव्हीचे हक्क आहेत आणि डिस्ने प्लस हॉटस्टारकडे डिजिटल अधिकार आहेत.

पुढील आशिया कप 2025 मध्ये होणार आहे, जो टी-20 फॉरमॅटमध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत या पुढील मोठ्या स्पर्धेच्या ठिकाणाबाबत (होस्टिंग) निर्णयही एसीसीच्या बैठकीत घ्यावा लागेल. ओमान आणि यूएई हे दोन देश आशिया चषक 2025 चे यजमानपदाचे सर्वात मोठे दावेदार आहेत.

पण यातही एक अडचण आहे. वास्तविक ओमान आणि UAE हे सध्या ACC चे सहयोगी देश आहेत, तर होस्टिंग फक्त पूर्ण सदस्यांसाठी उपलब्ध आहे. यापूर्वी 2023 आशिया चषक पाकिस्तानने श्रीलंका-पाकिस्तानमध्ये आयोजित केला होता. ही स्पर्धा भारतीय संघाने जिंकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com