Ravindra Jadeja : जगात एकच भारी फिल्डर .... जॉन्टीने सांगितलं कोण आहे सर्वोत्तम

Ravindra Jadeja Jonty Rhodes
Ravindra Jadeja Jonty RhodesESAKAL

Ravindra Jadeja Jonty Rhodes : दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि स्टार फिल्डर जॉन्टी ऱ्होड्सने सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिल्डर कोण आहे याचे उत्तर दिले. जगातील सर्वच क्रिकेट संघ आता फिल्डिंगवर चांगला भर देतात. त्यामुळे प्रत्येक संघात दर्जेदार फिल्डर्स आहे. त्यामुळे जगातील सर्वोत्तम फिल्डर कोण हे सांगणे खूप कठिण आहे.

दरम्यान, आपल्या फिल्डिंगसाठी जगविख्यात असलेल्या जॉन्टी ऱ्होड्सने सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फिल्डर कोण हे सांगून टाकले. जॉन्टीने भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हा जगातील सर्वोत्तम फिल्डर असल्याचे सांगितले.

Ravindra Jadeja Jonty Rhodes
IPL 2023 Impact Player : आता 11 नाही तर 12 खेळाडू खेळणार सामना; काय आहेत 'इम्पॅक्ट प्लेअर'चे नियम

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत जॉन्टी ऱ्होड्स म्हणाला की, सध्याच्या घडीला सर्वोत्तम फिल्डर म्हणून फक्त एकाच नाव घेता येईल ते म्हणजे रविंद्र जडेजा.' जॉन्टीने आपल्या मुलाखतीत इंडियन प्रीमियर लीगला फिल्डिंगचा स्तर उंचावण्याचे श्रेय दिले. आयपीएलची सुरूवात 2008 मध्ये झाली होती. आतापर्यंत त्याचे 15 हंगाम झाले आहे. यादरम्यान, खेळाडूंनी वर्षागणिक आपल्या फिल्डिंगचा स्तर वाढवलेला दिसून येतो.

जॉन्टी म्हणाला की, 'फक्त आयपीएल सुरू झाले तेव्हापासून लोकं फिल्डिंगवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात करतात. प्रत्येक संघाकडे फिल्डिंग कोच नाही. 50 षटकांच्या सामन्यात पुरेसा वेळ असतो. तुमच्याकडे 3 ते 4 चांगले खेळाडू असतात. तर 6 ते 7 लोकांची फिल्डिंग चांगली नसते. मात्र जेव्हापासून आयपीएल सुरू झाले आहे आपल्याला फिल्डिंगचा स्तर उंचावताना दिसतोय. 12 - 13 वर्षात हा चांगलाच वाढला आहे.'

Ravindra Jadeja Jonty Rhodes
Pune News : महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रिमिअर लिगमध्ये १६० खेळाडूंचा लिलाव

ऱ्होड्स पुढे म्हणाला की, 'आधी लोकं फिल्डिंगबद्दल बोलत होते. मात्र त्यावेळी फक्त 3 ते 4 खेळाडूंचीच फिल्डिंग चांगली होती. मात्र आता संघाचा फिल्डिंग स्तर चांगला झाला आहे. संघात फिल्डिंगचा विकास हा आभाळाला टेकला आहे.'

(Sports Latest News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com