Jyothi Yarraji VIDEO : हा खूप भयंकर अनुभव होता... चीनमध्ये भारताला रौप्य पदक जिंकून देणारी ज्योती असं का म्हणाली?

Asian Games 2023 Jyothi Yarraji
Asian Games 2023 Jyothi Yarraji esakal

Asian Games 2023 Jyothi Yarraji : चीनमधील हांगझू येथे सुरू असलेल्या 19 व्या एशियन गेम्स स्पर्धेत भारताच्या ज्योती यराजीने 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले. ती ज्या प्रकारे आपली सुरूवात करते तशी सुरूवात यावेळी तिला करता आली नाही. त्याचा फटका तिला बसला अन् रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

मात्र या सर्वाला पंचांचा तो कॉल देखील कारणीभूत ठरले. पंचांनी चीनची धावपटू वू यानी हिने चुकीचा सुरूवात केल्याने रेस थांबवली. ज्यातीने देखील चुकीची सुरूवात केल्याचे सांगण्यात आले. आता या सर्व प्रकरणावर ज्योतीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Asian Games 2023 Jyothi Yarraji
Asian Games 2023 : महिलांच्या अडथळा शर्यतीत फाऊलचा फिल्मी ड्रामा पण ज्योतीने रौप्य पटकावलंच...

एएनआय शी बोलताना ज्योती म्हणाली, 'हा खूप भयानक अनुभव होता. मी फक्त इतकंच सांगू इच्छिते की खेळात फसवेगीला कोणतेही स्थान असू नये. तिने चुकीची सुरूवात केली होती. हे आम्ही खूप ड्रामा झाल्यानंतर मान्य केले. मी अखेर रौप्य पदक जिंकले. ही माझी पहिली एशियन गेम्स स्पर्धा आहे. मी रौप्य पदक जिंकले आहे.'

Asian Games 2023 Jyothi Yarraji
Asian Games 2023 : दोन मुखर्जींनी रचला इतिहास; भारताला टेबल टेनिस महिला दुहेरीत मिळवून दिलं पहिलं पदक

अंतिम फेरीत चीनच्या वू यानी हिने प्रथम फाऊल स्टार्ट केला होता. वू हिने स्टार्ट घेतल्याचे लक्षात येताच ज्योती आणि जपानची युमी तनाका यांनीही स्टार्ट घेत धावण्यास सुरूवात केली. मात्र त्याचवेळी पंचांनी फाऊल झाल्याचे घोषित केले. त्यामुळे शर्यत थांबवण्यात आली व वू यानी आणि ज्योती या दोघींना बाद ठरवण्यात आले.

यावर ज्योतीने आक्षेप घेतला. बऱ्याच ड्रामेबाजी झाली. स्पर्धा झाल्यानंतर फाऊल तपासण्याचा निर्णय झाला. दुसऱ्यांदा शर्यत करताना ज्योतीची सुरूवात थोडी संथ झाली. मात्र तिने मधल्या वेळेत मुसंडी मारत तिसऱ्या क्रमांकाने शर्यत पूर्ण केली. तिला कांस्य पदक मिळाले होते.

Asian Games 2023 Jyothi Yarraji
World Cup 2023 : भारताच्या आदरातिथ्याने पाकिस्तानी संघाचा सपोर्ट स्टाफ चिंतेत... पत्रकार परिषदेत शादाब काय म्हणाला?

मात्र चीनच्या वू यानी आणि लिन युवेई यांनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले होते. मात्र फाऊल स्टार्टचा तपास करण्यात आला त्यावेळी फक्त वू यानीलाच स्पर्धेतून बाद करण्यात आले. त्यामुळे ज्योतीचे कांस्य पदक रौप्य पदकात रूपांतरित झाले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com