ICC T20 Ranking : रोहित-विराटला मागे टाकत राहुल ठरलाय नवा टॉपर!

Rahul-Rohit-Virat
Rahul-Rohit-Virat

ICC T20 Ranking : न्यूझीलंड : न्यूझीलंडला त्यांच्यात भूमीवर व्हाईटवॉश देत भारतानं ऐतिहासिक टी-20 मालिका विजय साजरा केला. या मालिकेत भारताची सलामीवीर जोडी के. एल. राहुल आणि रोहित शर्मा यांच्यासोबत कॅप्टन विराट कोहली यांनी लक्ष्यवेधी भूमिका पार पाडली. 

या तिघांनीही टी-20 सीरिजमध्ये आपल्या खेळीनं क्रिकेट फॅन्सचं चांगलंच मनोरंजन केलं. या सीरिजनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने जागतिक क्रमवारी (वर्ल्ड रँकिंग) जाहीर केली. यामध्ये हिटमॅन रोहित शर्मा आणि कॅप्टन विराट कोहलीला मागे टाकत राहुलने या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. ही त्याची कारकीर्दीतील सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. 

राहुलने या सीरिजमध्ये बॅट्समन आणि विकेटकीपरची भूमिका चांगलीच पार पाडली. सर्वात जास्त रन्स करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत तो टॉपर ठरला आहे. त्याने 56च्या सरासरीने 224 रन्सची बरसात केली. यावेळी त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोनशेपेक्षा जास्त रन्स करणारा तो एकमेव बॅट्समन ठरला आहे. त्यामुळे वर्ल्ड रँकिंगमध्ये त्याने सहाव्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. 

राहुलसह टीम इंडियातील रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, मनीष पांडे यांच्याही रँकिंगमध्ये सुधारणा दिसून आली आहे. हिटमॅन रोहित शर्माने तीन स्थानांची उडी घेत टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. तर अय्यर आणि पांडे अनुक्रमे 55 आणि 58 व्या स्थानावर पोहोचले आहेत. अय्यरने 63 तर पांडेने 12 स्थानांची झेप घेतली आहे. तर कॅप्टन विराट कोहली 9व्या स्थानी कायम राहिला आहे. तसेच न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन 16व्या स्थानी पोहोचला आहे. 

बॉलरच्या यादीत जसप्रित बुमराने 26 स्थानांची झेप घेत 11 व्या स्थानी विराजमान झाला आहे. तर स्पिनर युझवेंद्र चहल 30 व्या आणि शार्दूल ठाकूर 57 व्या स्थानी पोहोचले आहेत. नवखा नवदीप सैनी आणि रवींद्र जडेजा हे अनुक्रमे 71 आणि 76व्या स्थानावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com