केएसए चषक : ‘फुलेवाडी’चा ‘पीटीएम’(अ) वर विजय

KSA Football Competition Phulewadi Wins Kolhapur Marathi News
KSA Football Competition Phulewadi Wins Kolhapur Marathi News

कोल्हापूर - केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने पाटाकडील तालीम मंडळावर (अ) १-०ने आज मात केली. फुलेवाडीच्या मिशेलने उत्तरार्धात केलेला गोल निर्णायक ठरला. कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघाने संध्यामठ तरूण मंडळाला ४-० ने पराभूत केले. त्यांच्या ताहीद मालदीने तीन गोल केले. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

पाटाकडील विरूद्ध फुलेवाडी यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. फुलेवाडीचा गोलरक्षक निरंजन पाटील याचे उत्कृष्ट गोलक्षेत्ररक्षण फुलेवाडीसाठी उजवी बाजू ठरले. पूर्वार्धात ‘पाटाकडील’च्या ओंकार जाधव, रियाज यादगीर, ओंकार पाटील, ऋषीकेश मेथे-पाटील, प्रथमेश हेरेकर यांच्या चढायांच्या चढाया होता. तो रोखून ‘फुलेवाडी’च्या रोहित मंडलिक, मिचेल, राजू दास, प्रतिक सावंत, अक्षय मंडलिक यांनी प्रति चढाया केल्या. या वेळेत ‘पाटाकडील’च्या ऋषीकेश मेथे-पाटील व ओंकार पाटील यांनी गोलच्या सोप्या संधी दवडल्या. प्रथमेश हेरेकरच्या पासवर ऋषीकेश गोल करता करता राहिला. ‘फुलेवाडी’च्या मिचेलने पाटाकडीलचा गोलरक्षक अल्फाज हकीमच्या डोक्‍यावरून मारलेला चेंडू सैफ हकीमने बाहेर काढला. 

उत्तरार्धात ‘फुलेवाडी’च्या मिचेलने ४३ व्या मिनिटाला गोल करत ‘पाटाकडील’ला धक्का दिला. या गोलची परतफेड करण्यासाठी ‘पाटाकडील’च्या सुशांत बोरकर, ओंकार जाधव, अक्षय मेथे-पाटील, ऋषीकेश मेथे-पाटीलने ‘फुलेवाडी’ची बचावफळी सातत्याने भेदण्यावर भर दिला. त्यांच्या ऋषीकेशने ओंकार पाटीलच्या पासवर गोलची एक सोपी संधी दवडली. फुलेवाडीचा गोलरक्षक निरंजन पाटाकडीलच्या खेळाडूंच्या चढाया हाणून पाडत होता. फुलेवाडीकडून राजू दासच्या पासवर रोहित मंडलिक, प्रतिक सावंतच्या पासवर अक्षय मंडलिकने गोलची संधी गमावली. कोल्हापूर पोलिसने संध्यामठला सहज नमवले. त्यांच्या ताहीद मालदीने ५ व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. उत्तरार्धात सागर भोसलेने ६३, ताहीद मालदीने ८० व्या मिनिटाला गोल केल्यानंतर जादा वेळेत पुन्हा गोलची नोंद केली. ‘संध्यामठ’कडून अशिष पाटील, विराज साळोखे, संदेश पाटील, स्वराज्य सरनाईक यांनी चांगला खेळ केला. 

संबंधीत बातम्या - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com