SL vs IRE : कुसल मेंडिस पुन्हा चमकला! लंकेने खाते उघडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kusal Mendis Shine Sri Lanka Defeat Ireland

SL vs IRE : कुसल मेंडिस पुन्हा चमकला! लंकेने खाते उघडले

Sri Lanka Vs Ireland T20 World Cup 2022 : श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडिसने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत श्रीलंकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. श्रीलंकेने सुपर 12 च्या आपल्या पहिल्या सामन्यात धक्का देण्यात तरबेज असलेल्या आयर्लंडचा 9 विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडने 20 षटकात 8 बाद 128 धावांवर रोखले. आयर्लंडचे हे आव्हान श्रीलंकेने एका फलंदाजाच्या मोबदल्यात 15 षटकातच पार केले. लंकेकडून गोलंदाजीत वानिंदू हसरंगा आणि महीश तिक्षाणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा: IND vs PAK T20WC22 : इंग्लंडच्या बार्मी आर्मीला आलीये मस्ती! म्हणतात, India Vs Pakistan हे काय आहे?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडची सुरूवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात त्यांनी आपला पहिला फलंदाज गमवाला. त्यांनतर सलामीवीर स्टर्लिंगने सावध फलंदाजी करत नवव्या षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लागवले. मात्र 25 चेंडूत 34 धावा करून तो बाद झाला. स्टर्लिंग बाद झाल्यानंतर आयर्लंडचा डाव हॅरी टेक्टरने सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 42 चेंडूत 45 धावांची खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही.

श्रीलंकेकडून प्रत्येक गोलंदाजाने आजच्या सामन्यात विकेट घेतली. महीश तिक्षाणा आणि वानिंदू हसरंगा यांनी 2 विकेट्स घेतल्या तर फर्नांडो, कुमारा, करूणारत्ने आणि धनंजया डि सिल्वा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हेही वाचा: IND vs PAK T20 Live: अर्धा सामना जिंकला! रोहितने नाणेफेक जिंकून घेतली गोलंदाजी, पहा प्लेइंग-11

आयर्लंडचे 129 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या श्रीलंकेने दमदार सुरूवात केली. सलामीवीर कुसल मेंडिस आणि धनंजया डि सिल्वा यांनी 63 धावांची आक्रमक सलामी दिली. ही सलामी जोडीच 129 धावांचे टार्गेट पार करते का असे वाटत असताना डेलनेने धनंजया डि सिल्वा 31 धावांवर बाद केले.

मात्र त्यानंतर कुसल मेंडिसने अर्धशतकी खेळी करत चरीथ असलंकासोबत दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची नाबाद भागीदारी रचली. असलंकाने 22 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. तर कुसल मेंडिसने 43 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. श्रीलंकने 15 षकात 1 बाद 133 धावा करत सुपर 12 मधील आपला पहिला सामना जिंकला.