

Lamine Yamal lifts three-year-old brother after final win
Sakal
Lamine Yamal family celebration after Spain victory: फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धचे विजेतेपद रविवारी (१९ जुलै) स्पेनने जिंकत इतिहास घडवला. न्यू जर्सीमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाला १-० अशा गोलफरकाने पराभूत केले. त्यामुळे १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा स्पेनने वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले आहे. यापूर्वी २०१० मध्ये स्पेनने फिफा वर्ल्ड कप जिंकला होता.
स्पेनचा १९ वर्षांचा खेळाडू लामिन यमालसाठी (Lamine Yamal) ही पहिलीच वर्ल्ड कप स्पर्धा होती. पहिल्याच प्रयत्नात त्याने वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला आहे. दरम्यान, सामन्यानंतर त्याच्या ३ वर्षांच्या लहानग्या भावाने सर्वांचेच लक्ष वेधले होते.