चीनचा हा तर आपल्याविरुद्ध कट..! भारतीय खेळाडूंनी केला आरोप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

आपल्या देशाच्या सीमीचे संरक्षण करताना शहीद झालेले सैनिक हे खरेखुरे हिरो आहेत. देव त्यांच्या कुटुंबीयांना सामर्थ्य देओ, असे विराटच्या टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. 

नवी दिल्ली  : चिनी लष्काराविरुद्ध झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या आपल्या 20 जवानांना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, फुटबॉलचा माजी कर्णधार बायचुंग भुटिया क्रिकेपटू रोहित शर्मासह अनेक खेळाडूंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बीसीसीआयचा आयसीसीशी पंगा; आयपीएल घेणारच...​

गलवान खोऱ्यात देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या आपल्या जवानांना सलाम आणि त्यांच्याबद्दल मनापासून आदर आहे. सैनिकांपेक्षा कोणीही नि:स्वार्थी आणि धाडसी नाही. त्यांच्या कुटंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. आपल्या प्रार्थनांद्वारे त्यांना कठीण काळात शांती मिळेल, अशी भावना विराट कोहलीने व्यक्त केली आहे.

घरखरेदीने सरकारच्या तिजोरीला मिळाला आधार; लॉकडाऊनमध्ये 'इतक्या' कोटींची महसूलप्राप्ती...​

आपल्या देशाच्या सीमीचे संरक्षण करताना शहीद झालेले सैनिक हे खरेखुरे हिरो आहेत. देव त्यांच्या कुटुंबीयांना सामर्थ्य देओ, असे विराटच्या टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. 

भाजप नेता मोहित कंबोज यांच्यावर सीबीआयने केला गुन्हा दाखल; वाचा नेमकं प्रकरण काय....​

भारतीय सैनिकांवरचा हा हल्ला नियोजित कट होता. भारतात असलेल्या चिनी लोकांना मायदेशी बोलवले होते, त्यामुळे आपल्या सैनिकांवरचा हल्ला हा नियोजित कट असल्याचे सिद्ध होते, असे बायचुंग भुटियाने म्हटले आहे. भारताचा हा माजी फुटबॉल कर्णधार पुढे म्हणतो, चीनच्या या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आपल्या सरकारने चोख प्रत्युत्तर द्यावे. चीनत्या पोकळ आक्रमतेसमोर कमी पडू नये. ऑलिंपिक ब्राँझपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बॅटमिंटनपटू सायना नेहवाल, क्रिकेटपटू शिखर धवन यांनीही शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many sportsman reaction over india-china dispute