ज्यावेळी भावनांवर नियंत्रण येईल... मितालीनं निवृत्तीबाबत केलं वक्तव्य

mithali raj sets world record as captain in world cup
mithali raj sets world record as captain in world cup sakal

ICC Women's World Cup 2022: भारताची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) न्यूझीलंडमधील वर्ल्डकप हा आफला शेवटचा वर्ल्डकप असल्याचे सांगत निवृत्तीचे संकेत दिले होते. भारतीय महिला संघाने आज ( दि. 27 मार्च) दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा सामना अखेरच्या चेंडूवर गमावला आणि वर्ल्डकपमधील त्यांचे आव्हान संपुष्टात आले. यानंतर मिताली राज निवृत्तीचा (Retirement) निर्णय घेईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र मितालीनेच याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

mithali raj sets world record as captain in world cup
IPL 2022: हार्दिकला मिळाला अफगाणी डेप्युटी; GTने निवडला उपकर्णधार

सचिन तेंडुलकर आणि जावेद मियांदाद यांच्यानंतर सहा वर्ल्डकप खेळणारी मिताली राज तिसरी क्रिकेटपटू तर पहिलीच महिला क्रिकेटपटू आहे. 39 वर्षाच्या मितालीने वर्ल्डकप पूर्वीच आपली निवृत्ती जवळ आल्याचे संकेत दिले होते. भारताचा वर्ल्डकपमध्ये पराभव झाल्यानंतर मिताली राज म्हणाली, 'आम्ही वर्ल्डकपसाठी (ICC Women's World Cup 2022) जवळपास एका वर्षापेक्षा जास्त काळापासून सातत्याने मेहनत घेत होते. मात्र अशा प्रकारे तुमचा प्रवास संपल्यानंतर खूप निराशा होते. हे स्विकारण्यासाठी थोडा वेळ जावा लागले. मी अजून माझ्या भविष्याबाबत काही विचार केलेला नाही.'

mithali raj sets world record as captain in world cup
दिल्लीचे 'यादव' पडले भारी; 'सालाबाद' प्रमाणेच मुंबईची सुरूवात

मिताली राज पुढे म्हणाली, 'ज्यावेळी भावना नियंत्रणात असतील त्यावेळी मी भविष्याबाबत निर्णय घेईन.' मितालीला तिचा भारताकडून हा शेवटचा सामना असेल का असे विचारण्यात आल्यावर ती म्हणाली की, 'मी यावर बोलण्याच्या स्थितीत नाही आहे. मला माझ्या भविष्यावर आता काही बोलणे योग्य वाटत नाही. आम्ही आजच्या सामन्यात जशी कामगिरी केली आहे. ते पाहता आम्हाला आमच्या भावनांवर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com