

MLA Cup Kabaddi
Sakal
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणार्या चढाया-पकडींच्या संघर्षात मुंबईच्या मुंबई बंदर, भारत पेट्रोलियम आणि आयएसपीएलसह ठाणे महानगर पालिका या संघांनी थरारक विजयासह आमदार सुनील राऊत यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या व्यावसायिक गटाची उपांत्य फेरी गाठली.
महिला गटातही अंगावर शहारे आणणार्या रोमहर्षक लढतीनंतर मुंबईच्या शिवशक्ती, पुण्याच्या राजमाता जिजाऊ, पतंगराव कदम संघ आणि नंदुरबारच्या धर्मवीर कबड्डी संघाने उपांत्य फेरीत धडक मारली.