Mohammad Rizwan : रिझवानने नेदरलँडविरूद्धच्या लाईव्ह सामन्यात मैदानातच केलं नमाज पठण

Mohammad Rizwan
Mohammad Rizwan esakal

Mohammad Rizwan : पाकिस्तानने 2023 च्या आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवत आपली मोहीम सुरू केली. त्यांनी नेदरलँडविरूद्धचा सामना 81 धावांनी जिंकला. मात्र पाकने नेदरलँडविरूद्धचा आपला सोपा पेपर अवघड करून ठेवला होता. नेदरलँडने पाकिस्तानला कडवी टक्कर दिली होती.

नेदरलँडने टॉप ऑर्डर स्वस्तात गुंडाळात पाकिस्तानला 286 धावात रोखले होते. त्यानंतर 2 बाद 120 धावा करत दमदार सुरूवात देखील केली होती. मात्र त्यानंतर अनुभवी पाकिस्तानी संघाने सामन्यावर आपली पकड पुन्हा मिळवत 81 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मोहम्मद रिझवानने चांगली कामगिरी करत 75 चेंडूत 68 धावा केल्या आहेत.

Mohammad Rizwan
Asian Games : देवेंद्र फडणवीसांनी केले ओजसचे कौतुक ;आई-वडिलांशी संपर्क साधून व्यक्त केला आनंद

दरम्यान, पाकिस्तान आणि नेदरलँडविरूद्धचा सामना सुरू असतानाच मोहम्मद रिझवान मैदानावरच नामज पठण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यापूर्वीही मोहम्मद रिझवान 2021 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताविरूद्धच्या सामन्यावेळी मैदानात नमाज पठण करत असल्याचे दिसला होता. आता भारतात होत असलेल्या वर्ल्डकपमध्ये देखील मोहम्मद रिझवान असं करताना दिसतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नेदरलँडविरूद्धच्या सामन्यातील असल्याचा दावा केला जात आहे. नेदरलँड विरूद्धच्या सामन्यात तो नमाज पठण करताना दिसला होता. व्हिडिओत पाहिलं असता रिझवान ड्रिंक्स ब्रेकमध्ये नमाज पठण करताना दिसत आहे. पाकिस्तानचे इतर खेळाडू दुसऱ्या बाजूला थोडी रेस्ट करत असताना दिसत आहेत.

Mohammad Rizwan
BAN VS AFG World Cup 2023 : बांगला-अफगाण कोण देणार सलामी?

मोहम्मद रिझवानने संघाला अडचणीतून बाहेर काढलं. भारताचे पहिले तीन फलंदाज 38 धावांवर बाद झाले होते. त्यानंतर मोहम्मद रिझवानने साऊद शकिल यांनी मिळून 120 धावांची भागीदारी रचली. त्याने 8 चौकारांच्या मदतीने 75 चेंडूत 68 धावा केल्या.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com