
Asia Cup Final PM Modi Tweet Triggers Mohsin Naqvi Says Pakistan Has Beaten India Multiple Times
Esakal
आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भारतीय संघानं आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर नक्वी हे ट्रॉफीसह भारतीय संघाला देण्यात येणारी मेडल्ससुद्धा सोबत घेऊन गेले. नक्वी यांच्या या कृतीमुळे जोरदार टीका होत आहे. ट्रॉफी आणि मेडल्स पळवणाऱ्या नक्वी यांनी आता धक्कादायक असा दावा केलाय. भारतासोबत युद्धात पाकिस्तानच्या विजयाचा हास्यस्पद असा दावा ते करतायत.