MCA | बीसीसीआय प्रमाणे मुंबई देखील खेळाडूंना करणार 'करारबद्ध'

Mumbai Cricket Association Will Be Introduce Central Players Contract Like BCCI
Mumbai Cricket Association Will Be Introduce Central Players Contract Like BCCIESAKAL

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) बीसीसीआय (BCCI) प्रमाणे आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटपूटंना करारबद्ध करणार आहे. या संकल्पनेला एमसीएने तत्वतः मान्यता दिली आहे. एका वरिष्ठ एमसीए (MCA) अधिकाऱ्याने सांगितले की, 'हा निर्णय नुकत्याच झालेल्या वरिष्ठ सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या कराराचे स्वरूप बीसीसीआयच्या क्रेंद्रीय करारासारखेच (Central Contract) असले. याबाबतची संरचना लवकरच एमसीएसची क्रिकेट सुधार समिती तयार करेल.'

Mumbai Cricket Association Will Be Introduce Central Players Contract Like BCCI
ENG vs IND Live : इंग्लंडला पहिला धक्का मात्र पावसामुळे खेळ थांबला

एमसीएच्या क्रिकेट सुधार समितीत सध्या निलेश कुलकर्णी, जतिन परांजपे आणि विनोद कांबळी यांचा समावेश आहे. बसीसीआय आपल्या पुरूष आणि महिला खेळाडूंसाठी केंद्रीय करार पद्धतीचा अवलंब करते. या काराराअंतर्गत खेळाडूंना त्यांच्या ग्रेडनुसार वार्षिक रक्कम मिळते.

एमसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की 'एमसीएची क्रिकेट सुधारणा समिती खेळाडूंचे ग्रेड कशा प्रकारे तयार करता येईल हे पाहतील. याचबरोबर प्रत्येक ग्रेडला किती रक्कम द्यायची याचाही विचार केला जाईल. याचबरोबर कोणत्या खेळाडूंना करारबद्ध करायचे हे देखील याच समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात येणार आहे.'

Mumbai Cricket Association Will Be Introduce Central Players Contract Like BCCI
INDvsENG : जसप्रीत बुमराहने ब्रॉडची केली विक्रमी धुलाई; युवराजची झाली आठवण

दरम्यान, एमसीएने यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईच्या संघाला 1 कोटी रूपयांचे बक्षीस देखील जाहीर केले. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईचा पराभव केला होता. रणजी संघाचे नेतृत्व पृथ्वी शॉने केले होते. याचबरोबर एमसीएसने सी के नायडू ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या 25 वर्षाखालील संघाला देखील रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर कूच बिहार ट्रॉफीत उपविजेतपद पटकावणाऱ्या मुंबईच्या संघाला देखील बक्षीस मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com