सब ज्युनिअर मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो खो स्पर्धेत चुरस वाढली; आर्यसेना, श्री समर्थ अन् ॐ साईश्वर संघांची विजयी घोडदौड

Mumbai District Sub-Junior Kho-Kho: मुंबईतील सब ज्युनिअर जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील सामन्यांना चुरस आली आहे. आर्यसेना, श्री समर्थ (अ) आणि ॐ साईश्वर सेवा मंडळ यांनी दमदार विजय मिळवत विजयी घोडदौड कायम ठेवली.
Mumbai District Sub-Junior Kho-Kho

Mumbai District Sub-Junior Kho-Kho

Sakal

Updated on

मुंबईत ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरच्या मैदानावर सुरू असलेल्या किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२६-२७ मध्ये रविवारी (३ मे) किशोरी गटात जबरदस्त लढती रंगल्या.

महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित व मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत ॐ साईश्वर सेवा मंडळ, श्री समर्थ व्या. मंदिर (अ) आणि आर्यसेना यांनी दमदार विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी चपळता, अचूकता आणि आत्मविश्वास यांचा अप्रतिम संगम दाखवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

<div class="paragraphs"><p>Mumbai District Sub-Junior Kho-Kho</p></div>
Kho-Kho Digital Scoring: भारतीय मातीतील खेळ खो-खोचा नवा प्रवास: मातीचा सुगंध आता डिजिटल स्क्रीनवर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com