IND vs PAK : नवरात्रीअगोदरच ‘आठव्या माळे’ची संधी

विश्‍वकरंडकात पाकिस्तानविरुद्ध सात सामने जिंकणारा भारत सातत्य राखण्यासाठी सज्ज
IND vs PAK world cup 2023
IND vs PAK world cup 2023sakal

अहमदाबाद : रविवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवात दिवसागणिक माळेला सर्वाधिक महत्त्व असते; परंतु पाकिस्तानवरील विजयाची आठवी माळ उद्याच रुजवण्याची संधी भारतीय संघाला मिळणार आहे. एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आत्तापर्यंत सात विजय मिळवणारा भारतीय संघ हेच वर्चस्व कसे राखतो, याची उत्सुकता शिगेस पोहचली आहे.

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा सर्वात हायव्होल्टेज सामना म्हणून पाहिले जात असलेल्या भारत-पाक सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमचा रंगमंच सज्ज आहे. अहमदाबादचेच वातावरण नव्हे, तर संपूर्ण क्रिकेटविश्वात या सामन्याचा रोमांच ठासून भरला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे दोन्ही संघांचा असलेला फॉर्म.

दडपणाचा सामना करण्याचे आव्हान

गेल्या महिन्यात झालेल्या आशिया करंडक स्पर्धेत पाकचा पराभव करून भारतीयांनी आत्मविश्वास मजबूत केला असला, तरी वर्ल्डकपचा सामना, त्यात स्टेडियममध्ये लाखापेक्षा अधिक प्रेक्षकांची उपस्थिती, याचे दडपण निश्चितच असणार. भारतीयांनी प्रथम हे दडपण झुकारून द्यावे लागणार आहे.

IND vs PAK world cup 2023
Ind vs Pak : शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार? रोहित शर्माने 'ही' दिली अपडेट

बाबरचा आत्मविश्वास

प्रत्येक वेळी ७-० अशा भारत-पाक लढतीचा इतिहास सांगितला जात असला, तरी विक्रम हे कधी तरी मोडले जात असतात. उद्याचा दिवस आमच्या बाजूने असला, तर आम्ही पराभवांची ही मालिका तोडू, असा विश्वास पाक कर्णधार बाबर आझमने व्यक्त केला.

भारताचे पारडे जड

विश्वकरंडक स्पर्धेतील ७-० असा इतिहास आणि आशिया करंडक स्पर्धेतील यश यावरून भारताचे पारडे जड आहे; परंतु मैदानात उतरल्यावर दोन्ही संघ एकाच पातळीवर असतील. त्यामुळे भारतीयांना इतिहासापेक्षा वास्तवतेवर भर द्यावा लागणार आहे.

IND vs PAK world cup 2023
IND vs PAK World Cup 2023 : भारत - पाक वर्ल्डकप सामन्यात सर्वाधिक विकेट्स आहेत कोणाच्या नावावर?

सलामीला ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर भारतीयांना अफगाणिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवून या पाक सामन्यासाठी चांगली तयारी केली. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल फॉर्मात आहेत. शुभमन गिल तंदुरुस्त झाला, तर फलंदाजीस अधिक बळ मिळेल. अफगाणविरुद्ध श्रेयसनेही केलेल्या धावा भारताची फलंदाजी सक्षम करणारी आहे.

डावाच्या मध्यावर विकेट महत्त्वाच्या

भारत-पाक सामना असल्याने प्रत्येक क्षण महत्त्वाचा असणार आहे. सुरुवातीचे दडपण सांभाळल्यानंतर खेळ पुढे गेल्यावर डावाच्या मध्यावर अधिक विकेट मिळवणाऱ्या संघाला सामन्यावर पकड मिळवण्याची संधी असेल. त्यामुळे फिरकी गोलंदाजावर अधिक मदार असेल.

IND vs PAK world cup 2023
IND vs PAK World Cup 2023 : लाल की काळी माती; नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी कोणाला देणार साथ?

गोलंदाजीवर करावे लागणार काम

गोलंदाजीत मात्र भारतीयांनी परिश्रम करावे लागणार आहे. जसप्रीत बुमरा सुरुवातीला विकेट मिळवून देत आहे; परंतु गेल्या १७-१८ सामन्यात सुरुवातीला विकेट मिळवून देणारा मोहम्मद सिराज अपयशी ठरलेला आहे. उद्या तर त्याला गेल्या सामन्यातील शतकवीर अब्दुल्ला शफिक, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.

खेळपट्टी आणि हवामान

खेळाडूंचा संघर्ष जेवढा महत्त्वाचा तेवढीच खेळपट्टी आणि हवामानही प्रभाव पाडणारे ठरू शकेल. ऑक्टोबर हीट सुरू झाल्यामुळे येथील पारा दुपारी ३५ अंशांच्या पुढे असतो. खेळपट्टी आदल्यादिवशी झाकून ठेवण्यात आली होती. काही वेळ तिच्यावर पाणी मारण्यात आले; त्यानंतर पुन्हा आच्छादित करण्यात आली. यामुळे काहीसा ओलसरपणा असू शकेल.

नाणेफेक महत्त्वाची?

खेळपट्ट्या फलंदाजीस पोषक असल्या, तरी सायंकाळी विद्युत प्रकाशात फलंदाजी करणे अधिक सोपी जाते, असे गेल्या काही सामन्यांतून दिसून आले आहे. त्यामुळे नाणेफेक महत्त्वाची असेल, असे बाबरने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com