Glenn Phillips | VIDEO : जॉन्टीला विसरा आता! फिल्डिंगचा नवा आयकॉन 'फिलिप्स' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Zealand Glenn Phillips Fabulous Catch Gone Viral

Glenn Phillips | VIDEO : जॉन्टीला विसरा आता! फिल्डिंगचा नवा आयकॉन 'फिलिप्स'

Glenn Phillips Catch Video : टी 20 वर्ल्डकप 2022 मधील पहिल्याच सामन्यावर पावसाचे सावट होते. मात्र हवामान खात्याचा काही अंशी चुकला. काही अंशी म्हणण्याचं कारण म्हणजे न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला चांगलेच धुवून काढत धावांचा पाऊस पाडला. न्यूझीलंडचे 201 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 34 धावा अशी झाली होती. यावेळी मार्कस स्टॉयनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर डाव सावरण्याची जबाबदारी आली. मात्र स्टॉनिस 14 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. तो जरी सँटनरच्या गोलंदाजीवर बाद झाला असला तरी या विकेटचे सर्व श्रेय झेल पकडणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला जाते.

हेही वाचा: Finn Allen: अ‍ॅलनने स्टार्कची उडवली झोप, पहिल्याच षटकात केला कहर, 262 च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज मार्कस स्टॉयनिस हा मिचेल सँटनर समोर चाचपडतच खेळत होता. दरम्यान, सामन्याच्या 9 व्या षटकात धावांसाठी झगडणाऱ्या स्टायनिसने मोठा फटका मारून धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर कव्हर्सच्यावरून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. हा फटका जरी सीमा रेषेच्या बाहेर जाऊन पडला नाही तर तो नो मॅन्स लँडमध्ये पडले असे वाटले होते.

हेही वाचा: AUS vs NZ Devon Conway : वादळी वातावरणात कॉनवॉयचा 'तडाखा', यजमानांना पहिल्याच सामन्यात तगडे आव्हान

मात्र डीप कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण करणारा ग्लेन फिलिप्स चित्याच्या वेगाने धावत आला आणि त्याने हवेत 90 डिग्री डाईव्ह मारत हा अत्यंत अवघड झेल पकडला. ग्लेनने अविश्वनीय झेल पकडल्यानंतर स्टॉयनिसचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. टी 20 वर्ल्डकप 2022 च्या सुपर 12 मधील पहिल्याच सामन्यात स्पर्धेतील सर्वोत्तम कॅचेस पैकी एक कॅच ग्लेन फिलिप्स ने पकडून वातावरण निर्मिती केली आहे.