esakal | विराट, रोहित नव्हे तर 'हा' फलंदाज ४० चेंडूत ठोकू शकतो शतक
sakal

बोलून बातमी शोधा

Team-India

विराट, रोहित नव्हे तर 'हा' फलंदाज ४० चेंडूत ठोकू शकतो शतक

sakal_logo
By
विराज भागवत

भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरचं मत

IPL 2021 in UAE: भारतीय संघाने इंग्लंड दौरा नियोजित वेळापत्रकापेक्षा आधीच गुंडाळला. त्यामुळे आता भारतीय खेळाडू युएईमध्ये दाखल असून ६ दिवसाच्या क्वारंटाइनमध्ये आहेत. इंग्लंड दौऱ्यावर लोकेश राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, शार्दूल ठाकूर यासारख्या खेळाडूंनी दमदार फलंदाजी करून दाखवली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांचीही फलंदाजी चर्चेत राहिली. त्यानंतर आता, टी२० सामन्यात ४० चेंडूंमध्ये शतक ठोकण्याची धमक कोणत्या भारतीय खेळाडूमध्ये आहे, याचे उत्तर माजी सलामीवीर गौतम गंभीरने दिले.

हेही वाचा: IPL 2021: आला रे... सचिन देणार अर्जून अन् MI ला क्रिकेटचे धडे

"IPL किंवा कोणत्याही टी२० सामन्यात शतक ठोकणं हे खूप कठीण आहे. पण अनेक खेळाडूंनी टी२० सामन्यात शतक ठोकण्याची किमया साधली आहे. अवघ्या ४० चेंडूत शतक मारण्याची क्षमतादेखील एका फलंदाजांमध्ये आहे. ४० चेंडूत शतक ठोकायचे असेल तर खूपच चांगला स्ट्राईक असावा लागतो. त्या स्ट्राईक रेटने खेळून संपूर्ण डाव सावरण्याची क्षमता असलेला क्रिकेटपटू म्हणजे लोकेश राहुल. त्याची खेळी आणि फॉर्म पाहता तो नक्कीच ४० चेंडूत १०० धावांची खेळी करू शकतो", असे मत गंभीरने व्यक्त केले.

Gautam Gambhir

Gautam Gambhir

हेही वाचा: IPL 2021: ठरलं! स्टार स्पोर्ट्सने जाहीर केलं कॉमेंट्री पॅनेल

दरम्यान, राहुल IPL मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करतो. पंजाबकडून खेळणाऱ्या इंग्लंडच्या डेव्हिड मलानने दुसऱ्या टप्प्यातून माघर घेतली. पण असे असले तरी टी-20 स्पेशलिस्टच्या जागा काही वेळातच भरली. दक्षिण आफ्रिकेच्या एडम मार्करम याला पंजाबच्या ताफ्यात मलानचा बदली खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले. शनिवारी इंग्लंडचा फलंदाज डेविड मलान याने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात त्याला केवळ एकाच सामन्यात संधी मिळाली होती.

loading image
go to top