INDvsSA : कोरोनाच्या दहशतीमुळे IPL नंतर भारत-दक्षिण आफ्रिका मालिकाही रद्द!

INDvsSA_ODI
INDvsSA_ODI

मुंबई : देशात कोरोना व्हायरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामुळे खबरदारीचे सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. अशातच आयपीएल होणार की नाही, असा प्रश्‍न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला होता.

आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकला असतानाच बीसीसीआयने खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा रद्द केला आहे. यामुळे चाहत्यांची पार निराशा झाली आहे. न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय व कसोटी मालिकेत भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर क्रिकेटचे चाहते पार निराश झाले होते.

यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा व आयपीएलकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला खरा; मात्र, पावसामुळे सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. यानंतर लखनऊ व कोलकाता वन-डे सामन्याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दक्षिण आफ्रिकेचा भारत दौराच रद्द करण्यात आलेला आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे. 

सध्या भारतात कोरोना विषाणूचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहे. यामुळचे पेक्षकांविना भारत-दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय सामना खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. रविवारच्या (ता. 15) सामन्यासाठी भारतीय संघ लखनऊत दाखलही झाला होता. मात्र, बीसीसीआयने हा दौराच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

इंग्लंडनेही घेतली माघार 

क्रिकेट विश्‍वावर राज्य करणाऱ्या बीसीसीआयने सामने रद्द केल्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या संघाने माघार घेण्याचे ठरवले आहे. इंग्लंडचे सर्व खेळाडू तातडीने मायदेशी परतणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बोर्डांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. 

आयपीएल 15 एप्रिलपासून 

कोरोना व्हायरसमुळे सार्वजनिक कार्यक्रम, मेळावे, संमलेन रद्द होत असताना आयपीएल होणार की नाही, असा प्रश्‍न आरोग्य मंत्र्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी गर्दी तयार होईल असे कार्यक्रम न झाले तर योग्य होईल असे म्हटले होते. शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आयपीएल 15 एप्रिलपासून सुरू होईल. यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com