PAK vs ENG T20 World Cup 2022
PAK vs ENG T20 World Cup 2022sakal

PAK vs ENG : फायनलवर खतरा! इतिहासात पहिल्यांदाच होणार ही गोष्ट...

दोन्ही दिवस पाऊस पडला आणि लढत खेळवण्यात आली नाही, तर दोन्ही संघांना

PAK vs ENG T20 World Cup 2022 : टी-२० विश्‍वकरंडकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. ४४ लढतींच्या धुमश्‍चक्रीनंतर आता स्पर्धेला जेता ठरणार आहे. इंग्लंड - पाकिस्तान या दोन माजी विजेत्यांमध्ये अजिंक्यपदाची लढत येत्या १३ नोव्हेंबरला होणार आहे; पण रविवारी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर राखीव दिवस असलेल्या सोमवारीही (ता. १४) वरुणराजाचे आगमन होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दोन्ही दिवस पाऊस पडला आणि लढत खेळवण्यात आली नाही, तर दोन्ही संघांना जेतेपद विभागून देण्यात येणार आहे.

PAK vs ENG T20 World Cup 2022
Anil Kumble : कुंबळेने लाजीरवाण्या पराभवानंतर BCCI ला 'लीग क्रिकेट'बाबत दिला सल्ला

इंग्लंडच्या संघाने टी-२० विश्‍वकरंडकाआधी पाकिस्तानवर ४-३ असा टी-२० मालिका विजय संपादन केला होता. तसेच गतविजेत्या ऑस्ट्रेलियालाही २-० अशी धूळ चारली होती. या दोन्ही मालिका इंग्लंडने पाकिस्तान व ऑस्ट्रेलियामध्ये जिंकल्या होत्या. त्यामुळे आता जॉस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ टी-२० विश्‍वकरंडक जिंकण्याची स्वप्न पाहत असेल यात शंका नाही. दरम्यान, टी-२० विश्‍वकरंडकाआधी पाकने न्यूझीलंडमधील तिरंगी टी-२० मालिका जिंकण्याची किमया करून दाखवली होती.

PAK vs ENG T20 World Cup 2022
T20 World Cup 2022 : 'मालिकावीर'साठी विराट अन् सूर्यकुमारमध्ये असणार चुरस

प्रत्येकी दहा षटकांचा खेळ अनिवार्य

आयसीसीकडून बाद फेरीसाठी नियमात बदल करण्यात आले आहेत. साखळी फेरीत दोन्ही संघांनी किमान पाच षटके खेळली की सामन्याचा निकाल निश्‍चित होत असे; पण आता दोन्ही संघांनी प्रत्येकी १० षटके खेळणे अनिवार्य असणार आहे. एका संघाने दहा षटके फलंदाजी केली, पण दुसऱ्या संघाने दहा षटके खेळण्याआधी पाऊस आला. त्यानंतर खेळच होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना जेतेपद विभागून दिले जाईल. तसेच अंतिम फेरीच्या लढतीला रविवारी सुरुवात झाली; पण काही काळानंतर या लढतीत पावसाचा व्यत्यय आला. अशा परिस्थितीत उर्वरित लढत सोमवारी खेळवण्यात येईल. सोमवारीही पावसाच्या व्यत्ययाने खेळ पूर्ण होऊ शकला नाही, तर अजिंक्यपदाची विभागणी करण्यात येईल. टी-२० विश्‍वकरंडकाच्या जेतेपदाच्या लढतीत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असल्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा पसरली आहे. या स्पर्धेची अंतिम लढत होऊन स्पर्धेला जेता मिळावा, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

PAK vs ENG T20 World Cup 2022
Shaheen Afridi : वसिम अक्रमसारखा शाहीन आफ्रिदी देखील इतिहास घडवणार?

दृष्टिक्षेपात

  • हवामानशास्त्र विभागाकडून रविवारी व सोमवारी ९५ टक्के पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

  • पावसाच्या व्यत्ययामुळे रविवारी कमी षटकांच्या सामन्याला सुरुवात झाली; पण त्यानंतर पुन्हा पावसाचा व्यत्यय आला व ही लढत पूर्ण होऊ शकली नाही. अशा परिस्थितीत सोमवारी पुन्हा २० षटकांचा सामना खेळवण्यात येईल.

  • राखीव दिवसात अंतिम फेरीचा सामना खेळवण्यात आल्यास त्यासाठी चार तासांचा अतिरिक्त वेळ देण्यात या वेळी आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com