
India Vs Pakistan Viral Moment Fan Supports India In Stadium
Esakal
India Pakistan Match: आशिया कप २०२५ मध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना झाला. या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजी करत असताना भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. त्यावेळी स्टेडियममध्ये असलेल्या एका पाकिस्तानी चाहत्यानं त्याची जर्सी बदलून भारतीय जर्सी घातली. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.