Paris Olympic 2024: भारतीय पथकाचा शरथ कमल ध्वजवाहक, तर मेरी कोमकडेही महत्त्वाची जबाबदारी

Sharath Kamal flag bearer: पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाचा ध्वजधारक म्हणून शरथ कमलकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Major Dhyan Chand Khel Ratna Achanta Sharath Kamal
Major Dhyan Chand Khel Ratna Achanta Sharath Kamal esakal

Sharath Kamal flag bearer: साल 2024 हे ऑलिम्पिकचे वर्ष आहे. यंदा पॅरिसमध्ये जुलै महिन्याच्या अखेरीस ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी भारताचा दिग्गज टेबल टेनिसपटू शरथ कमल याला ध्वजधारक बनण्याचा मान देण्यात आला आहे.

त्याला ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय पथकाचा ध्वजधारक म्हणून नेमण्यात आले असून ऑलिम्पिक पदक विजेची बॉक्सर मेरी कोम हिला प्रमुख (Chef de mission) बनवण्यात आले आहे.

याबद्दल इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने गुरुवारी (21 मार्च) माहिती दिली आहे. दरम्यान ऑलिम्पियन शिवा केशवन यांना उपप्रमुखपद देण्यात आले आहे.

Major Dhyan Chand Khel Ratna Achanta Sharath Kamal
Mumbai Indians Viral Video: गुलाबी साडी अन् लाली... सोनावणे वहिनींचा MI सोबत धुमाकूळ, ईशान किशनही लाजला

याबद्दल इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने म्हटले आहे की 'खेळासाठी मेरी कोमने दिलेले अतुलनीय समर्पणामुळेच तिची निवड ऑलिम्पिकमध्ये आमच्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी करण्यात आली आहे.'

'केशवननेही ल्युग क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्याचा अनुभव आणि ज्ञान संघव्यवस्थापनाला मदतगार ठरेल.'

Major Dhyan Chand Khel Ratna Achanta Sharath Kamal
Ruturaj Gaikwad: 'भाऊ, धोनीची जागा भरून काढणं कठीण; पण तू...', सूर्याची CSK कॅप्टन ऋतुराजसाठी स्पेशल पोस्ट

त्याचबरोबर ऑलिम्पिक पदक विजेता गगन नारंग शुटिंग रेंजमध्ये भारताचे व्यवस्थापन पाहिले. कारण शुटिंग रेंज स्पर्धेच्या मुख्य ठिकाणापासून बरेच लांब आहे. नेमबाजीत 19 कोटा भारताने आत्तापर्यंत मिळवले आहेत. त्यामुळे हे भारताचे नेमबाजीतील सर्वात मोठे पथक असणार आहे.

दरम्यान इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने अशीही माहिती दिली की महत्त्वाच्या पदावर नेमणूक करताना खेळाडूंचा अनुभव, कौशल्य आणि नेतृत्वगुण यांचा विचार करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com