दिल्लीच्या संघाला मोठा दिलासा, Prithvi Shaw लवकरच ताफ्यात परतणार |Prithvi Shaw discharged from hospital | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prithvi shaw
दिल्लीच्या संघाला मोठा दिलासा, Prithvi Shaw लवकरच ताफ्यात परतणार

दिल्लीच्या संघाला मोठा दिलासा, Prithvi Shaw लवकरच ताफ्यात परतणार

दिल्ली कॅपिट्लसच्या संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीचा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ लवकरच संघाच्या ताफ्यात परतणार आहे. प्रकृती बिघडल्याने तो गेले काही सामने खेळू शकला नव्हता. मात्र, आता या खेळाडूला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

हेही वाचा: उमरान मलिकचे स्पीड पाहून शोएब अख्तरला झोंबली मिर्ची, म्हणाला...

मे महिन्याच्या सुरुवातीपासून पृथ्वी शॉ संघाबाहेर आहे. पृथ्वी आजारी असल्यामुळे सामन्यांना मुकला होता. ताप आल्यामुळे 8 मे रोजी पृथ्वी शॉ रुग्णालयातही दाखल झाला होता. पृथ्वी शॉने ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पृथ्वी शॉला टायफॉड झाला होता. त्यामुळे तो आयपीएलला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान त्याला डिस्जार्ज देण्यात आला आहे. त्याने ही माहिती स्वतः दिली आहे.

त्याने स्वतः दिलेल्या माहितीनुसार, तो हॉटेलमध्ये परतला आहे. सध्या तो पुर्ण बरे होण्याच्या मार्गावर आहे. दिल्लीची चिकित्सा टीम त्याच्यावर नजर ठेवून आहे.

हेही वाचा: मोदी माझ्या काश्मीरी हिंदू बहिणींची व्यथा ऐका; रैनाने शेअर केला Emotional Video

शॉने एक मे ला लखनऊविरुद्ध अखेरची मॅच खेळली होती. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने तो झालेल्या तीन सामन्यात खेळू शकला नव्हता. रुग्णलायात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर इस्टाग्रामवर पोस्ट करत स्वतः शॉने माहिती दिली होती.

मी तापाने फनफनत आहे. तुमच्या प्रार्थनेसाठी सर्वांचे आभार. लवकरच मी परतेन. आशा आशयाची पोस्ट शॉने शेअर केली होती.

शॉने या सीझनमध्ये आत्तापर्यंत 9 सामन्यात 28.78 च्या सरासरीने 259 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत.

Web Title: Prithvi Shaw Discharged From Hospital Franchise Confirmed On Its Social Media Delhi Capitals

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top