Prithvi Shaw attacked : पृथ्वी शॉच्या अडचणी वाढणार, मुंबई पोलिसांनी केले अटकसत्र सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithvi Shaw Fight Mumbai Police Arrest Friend

Prithvi Shaw attacked : पृथ्वी शॉच्या अडचणी वाढणार, मुंबई पोलिसांनी केले अटकसत्र सुरू

Prithvi Shaw Fight Mumbai Police Arrest Friend : पृथ्वी शॉवर सेल्फीची मागणी करणाऱ्या आपल्याच चाहत्याशी झटापट केल्याचा आरोप गुरूवारी झाला होता. याबाबतचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या प्रकरणार दोन्हीकडून एकमेकांविरूद्ध आरोप प्रत्यारोप आणि तक्रारी दाखल झाल्या होत्या. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी पृथ्वी शॉच्या 8 मित्रांपैकी एकाला अटक केली आहे.

मुंबईत पृथ्वी शॉला काही चाहत्यांनी सेल्फीसाठी विचारणा केली होती. त्यावेळी त्याने सेल्फीसाठी नकार दिला. यानंतर वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर झटापटीत देखील झाले. चाहत्यांनी पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांनी आमच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला होता. पृथ्वी शॉने देखील फॅन्सनी त्याच्यावर हल्ला चढवण्याची तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतली आहे.

याचबरोबर पृथ्वी शॉच्या 8 मित्रांपैकी एकाला अटक देखील केली आहे. त्यामुळे हे प्रकरण नुकतेच टीम इंडियात पुनरागमन केलेल्या पृथ्वी शॉला जड जाण्याची शक्यता आहे. याबाबत डीसीपी अनिल पारसकर यांनी सांगितले की, 'मुंबईतील ओशीवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर बेकायदेशीरपणे जमाव जमवणे आणि इतर कलमे लावली आहेत. आरोपींनी गाडीचे नुकसान केल्याची तक्रार आहे. त्यांनी 50000 रूपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतरांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.'

(Sports Latest News)