Sakal Marathon 2022 : 'शानदार, जबरदस्त, जिंदाबाद'! पुणेकर धावले सुसाट

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील रविवारची ती पहाट सुखावणारी होती. सगळीकडे चैतन्यमयी वातावरण होतं.
Sakal Marathon 2022
Sakal Marathon 2022 esakal

Pune Half Marathon 2022: पुणेकर आणि सकाळचं नातं हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही. सकाळच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांना नेहमीच पुणेकरांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आजची रविवारची सकाळ पुणेकरांसाठी स्पेशल होती. गुलाबी थंडीत पुणेकरांनी सकाळ आणि बजाज अलियान्झच्या वतीनं आयोजित केलेल्या पुणे हाफ मॅरेथॉनला भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील रविवारची ती पहाट सुखावणारी होती. सगळीकडे चैतन्यमयी वातावरण होतं. स्पर्धकांची वर्दळ होती. काही जण वार्म अप करण्यात व्यस्त होते तर काही जण मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी काय खास स्टॅट्रजी असावी याबद्दल चर्चा करत होते. अशा प्रसन्न आणि प्रेरणादायी वातावरणात मॅरेथॉन सुरु झाल्याची शिट्टी वाजली आणि हजारो पुणेकर स्पर्धक सुसाट सुटले. सकाळ माध्यम समूह आयोजित बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धा पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज मोठ्या उत्साहात पार पडली.

हेही वाचा - काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

केवळ पुणेच नाहीतर राज्यातील वेगवेगळ्या जिल्हयातून तसेच परराज्यातूनही अनेक स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांचा उत्साह ओसंडून वाहणारा होता. विजेत्या स्पर्धकांचे पुणेकरांनी मोठया जल्लोषात स्वागत केले. विशेषत, याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी स्पर्धेत घेतलेला सहभाग हा लक्ष वेधून घेणारा होता. त्यांनाही उस्फुर्त दाद मिळाल्याचे दिसून आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निशाण उंचावत स्पर्धेला सुरुवात झाल्याचे जाहीर केले.

दोन वर्षांनंतर मॅरेथॉनच्या तिसऱ्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. यात पुणेकरांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धक यावेळी धावले. ही मॅरेथॉन २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी अशा विविध ४ श्रेणीत ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी आयोजकांच्यावतीनं सर्वोतोपरी जय्यत तयारी करण्यात आली होती. सहभागी झालेल्या स्पर्धकांनी त्याविषयी समाधान व्यक्त करत सकाळ माध्यम समुहाला या उपक्रमासाठी धन्यवाद कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Sakal Marathon 2022
SAKAL Exclusive : सर्वसामान्यांवर कारवाईचा दंडुका, पोलिसांना मात्र सवलत
Sakal Marathon 2022
SAKAL Exclusive : कॉम्‍प्‍युटर, IT इंजिनिअरिंग ‘लई भारी..!’; अभियांत्रिकीला वाढले प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com