टेस्टमध्ये रविंद्र जाडेजा बेस्ट; रोहित-विराटमध्ये स्पर्धा

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ज्यो रुट टॉपला आहे.
Ravindra Jadeja
Ravindra JadejaFile Photo

ICC Test Player Rankings : आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) सर्वात भारी ठरलाय. अष्टपैलू क्रिकेटर्सच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत वेस्ट इंडीज जेसन होल्डर 412 गुणांसह अव्वलस्थानी आहे. जाडेजाच्या खात्यात 353 गुण आहेत. या यादीत त्याच्यापाठोपाठ अवघ्या एका गुणाच्या अंतराने आर अश्विन तिसऱ्या स्थानावर आहे. एवढचं नव्हे तर रविचंद्रन अश्विन (R Ashwin) गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्याशिवाय गोलंदाजी क्रमवारीत जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) टॉप टेनमध्ये स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरलाय. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात विश्रांतीवर असलेला बुमराह 763 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

Ravindra Jadeja
Omicron : आफ्रिकेत होणारी कुस्ती स्पर्धा अनिश्चितकाळासाठी स्थगित

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ज्यो रुट टॉपला आहे. इंग्लंड कर्णधाराने आपल्या खात्यात 903 गुण जमा केले आहेत. त्याच्यापाठोपाठ स्टीव्ह स्मिथ (891), केन विल्यमसन (888) आणि मार्कस लाबुशेन (878) यांचा नंबर लागतो. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने 805 गुणांसह पाचवे स्थान कायम राखले आहे. त्याच्यापाठोपाठ किंग कोहलीचा नंबर लागतो.

Ravindra Jadeja
IND VS NZ : रहाणे, पुजाराला संधी मिळणार?

रोहित आणि विराट दोघही न्यूझीलंड विरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यात खेळताना दिसले नव्हते. रोहित शर्मा पुढच्याही कसोटी सामन्यात खेळणार नाही. दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मुंबई कसोटी सामन्यात संघात कमबॅक करेल. न्यूझीलंड विरुद्ध मोठी खेळी करुन आपले स्थान भक्कम करण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. किमान त्याला रोहित शर्माला ओव्हरटेक करणंही सहज शक्य होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com