Rohit Sharma : कर्णधार रोहितने पंत अन् कार्तिकबाबत दिली मोठी अपडेट, म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma Statement About Rishabh Pant

Rohit Sharma : कर्णधार रोहितने पंत अन् कार्तिकबाबत दिली मोठी अपडेट, म्हणाला...

Rohit Sharma Statement About Rishabh Pant : टी 20 वर्ल्डकप 2022 मधील भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल अवघ्या काही तासांवर आली आहे. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी संघात सेमी फायनलच्या दृष्टीने काही बदल होतील का याबाबत विचारण्यात आल्यानंतर रोहिने दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्याबद्दल एक मोठी अपटेड दिली.

हेही वाचा: IND vs ENG : सेमी फायनलपूर्वी टीम इंडियाने 'ब्रिटिश राज'च्या जेवणावर मारला ताव

दिनेश कार्तिक हा भारताचा मॅच फिनिशर म्हणून संघात भुमिका बजावतो. तसेच तो विकेटकिपिंगची जबाबदारी देखील सांभाळत आहे. दुसरीकडे ऋषभ पंतला यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फक्त झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र प्रत्येक सामन्यात ऋषभ पंत खेळणार का ही चर्चा सुरूच असते. कारण भारताच्या सध्याच्या संघातील तो एकमेव चांगला डावखुरा फलंदाज आहे.

दरम्यान, रोहित शर्माने पंतला झिम्बाब्वेविरूद्ध खेळवण्याचा निर्णय हा रणनितीच्या दृष्टीकोणातून घेण्यात आला असल्याचे सांगितले. पंतलाच यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याला झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली.

रोहित शर्मा अॅडलेड येथील पत्रकार परिषदेत म्हणाला की, 'जर आम्हाला सेमी फायनल आणि फायनलसाठी संघात काही बदल करण्याची गरज भासली तर आम्ही बदल करू. एखाद्या खेळाडूला थेट सेमी फायनल आणि फायनलमध्ये खेळवणे योग्य नाही. त्याला आधी सामना खेळण्याची संधी मिळाली पाहिजे.'

हेही वाचा: Suryakumar Yadav : सेमीफानलपूर्वी सूर्याने लावला शॉपिंगचा धडाका; कॅप्टन रोहितने केला खुलासा

रोहित पुढे म्हणाला की, 'आम्ही खेळाडूंना आधीच सांगून ठेवले आहे की प्रत्येकाने कोणत्याही क्षणी अंतिम 11 मध्ये खेळण्याची तयारी ठेवा, मग ती सेमी फायनल, फायनल असो वा साखळी फेरी असो. आम्ही न्यूझीलंड आणि इंग्लंडविरूद्ध डावखुऱ्या फलंदाजाला मधल्या षटकात फिरकीवर आक्रमण करण्याची संधी देऊ इच्छितो, याच कारणामुळे पंतला सामना झिम्बाब्वेविरूद्ध खेळवण्यात आले होते.'

रोहितने पंत सेमी फायनलमध्ये खेळू शकतो असे संकेत दिले मात्र स्पष्टपणे बोलण्यास त्याने नकार दिला. तो पुढे म्हणाला, 'उद्या काय होईल हे मी आता सांगू शकत नाही. मात्र दोन्ही विकेटकिपरबाबत विचार सुरू आहे हे नक्की.'