T20 World Cup : रोहित - विराट टी 20 मध्ये करणार कमबॅक; बीसीसीआयला स्पष्टच सांगितलं

T20 World Cup Rohit Sharma Virat Kohli
T20 World Cup Rohit Sharma Virat Kohliesakal

T20 World Cup Rohit Sharma Virat Kohli : भारताचे दोन वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे जवळपास वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय टी 20 स्पर्धा खेळलेले नाही. मात्र आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीने बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितलं आहे की ते टी 20 क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे जून महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये रोहित आणि विराट खेळण्याची शक्यता वाढली आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली 2022 मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्डकपनंतर भारताकडून टी 20 सामनना खेळलेले नाहीत. त्यांनी वनडे वर्ल्डकपमध्ये 50 षटकांच्या सामन्यावर आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं होतं. आता त्यांनी ते टी 20 संघ निवडीसाठी उपलब्ध असल्याचे कळवले आहे.

T20 World Cup Rohit Sharma Virat Kohli
Sunil Gavaskar : सॉरी तुम्ही फलंदाज नाही कारण... सुनिल गावसकरांनी कोणाला हाणला टोला?

बीसीसीआयची निवडसमितीची आज (दि 05) बैठक होणार आहे. या बैठकीत अफगाणिस्तानविरूद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी आणि इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी बारतीय संघाची निवडीबाबत चर्चा होणार आहे.

अफगाणिस्तानविरूद्धची मालिका ही 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर इंग्लंडविरूद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका ही 25 जानेवारीपासून सुरू होईल. जून महिन्यात वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत टी 20 वर्ल्डकप 2024 सुरू होत आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहली आणि रोहित शर्मा ते टी 20 साठी तयार असल्याचे सांगितले आहे.

T20 World Cup Rohit Sharma Virat Kohli
Saim Ayub Video : सईम अयूबच्या टोपीमुळे अडला चौकार तरी का दिल्या नाहीत पेनाल्टीच्या 5 धावा?

अफगाणिस्तान मालिकेत रोहित - विराट खेळणार?

अफगाणिस्तान विरूद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव खेळणार नाहीयेत. दोघांच्याही घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे टी 20 संघाचं कर्णधारपद कोणाकडे सोपवणार हा मोठा प्रश्न निवडसमितीसमोर आहे. निवडसमितीला या मालिकेसाठी नवा कर्णधार नियुक्त करावा लागेल.

निवड समिती मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहला अफगाणिस्तान मालिकेसाठी विश्रांती देण्याचा गांभिऱ्याने विचार करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर सिराज आणि बुमराहला फिट ठेवणं देखील गरजेचं आहे कारण 25 जानेवारीपासून भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे.

निवडसमिती एस एस दास, सलिल अंकोला, अजित आगरकर हे केप टाऊनमध्ये उपस्थित होते. त्यांनी रोहित, विराटशी चर्चा केली असून हे दोघे टी 20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार की नाही हे संघ जाहीर झाल्यावरच समजेल.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com