Sunil Gavaskar : सॉरी तुम्ही फलंदाज नाही कारण... सुनिल गावसकरांनी कोणाला हाणला टोला?

Sunil Gavaskar
Sunil Gavaskaresakal

Sunil Gavaskar : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना दोन दिवसाच्या आतच संपला. दोन कसोटी सामन्यांची मालिका ही अवघ्या पाच दिवसात संपली. पहिली कसोटी तीन दिवसात तर दुसरी कसोटी जवळपास दीड दिवसातच आटोपली. पाच सत्रात 30 विकेट्स पडल्या.

त्यानंतर केप टाऊनच्या न्यूलँड्सवरील खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. तसेच फलंदाजांच्या सुमार कामगिरीवर देखील टीका होत आहे.

भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी खेळपट्टीपेक्षा फलंदाजांच्या तंत्रालाच जास्त दोष दिला. त्यांच्या मते उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवरच नाही तर फिरकी घेणाऱ्या खेळपट्टीवर देखील फलंदाजांची परीक्षा असते असं ते म्हणाले.

Sunil Gavaskar
Saim Ayub Video : सईम अयूबच्या टोपीमुळे अडला चौकार तरी का दिल्या नाहीत पेनाल्टीच्या 5 धावा?

इंडिया टुडेशी बोलताना गावसकर म्हणाले की, 'कसोटी क्रिकेट हे असंच आहे. तुमची इथे परीक्षा पाहिली जाईल.SENA देशातील माध्यमांची जर तुम्हाला वेगवान खेळपट्टीवर खेळता येत नसेल तर तुम्ही फलंदाजाच नाही अशी धारणा आहे. मात्र मला वाटते की जर तुम्हाला चेंडू मोठ्या प्रमाणावर स्पिन होत असलेल्या खेळपट्टीवर खेळता येत नसेल तर तुम्ही फलंदाज नाही.'

गावसकर पुढे म्हणाले की, 'मला माफ करा जर तुम्ही फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर फलंदाजी करू शकत नसाल तर तुम्ही फलंदाज नाही. वेगवान खेळपट्टीवर चेंडू खेळताना फक्त दोन मुव्हमेंट करता येतात. मात्र फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर चार फिरकीपटूंचा सामना करताना तुम्हाला स्टेप आऊट व्हाव लागतं. तुम्हाला क्रीजचा वापर करावा लागतो. तुमच्या भात्यात अनेक फटके असावे लागतात.'

Sunil Gavaskar
Wrestling Competition : कामगार व कुमार केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत

'त्यामुळं तुम्हाला माहिती आहे की मला वाटतं की आपल्या माध्यमांनी याबाबत लिहीलं पाहिजे. आपली माध्यमे ज्या गोष्टी माहिती आहेत त्याबद्दलच बोलत असतात. आपली माध्यमे कधी कधी खेळाडूंच्या मुलाखती घेण्यावरच अवलंबून असते. ते कोणालाही दुखवू इच्छित नाही. त्यामुळे ते विदेशी खेळाडूंच्या बॅटिंग स्टाईलवर कधी प्रश्न उपस्थित करत नाहीत.'

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com