esakal | ठाण्याच्या पठ्ठ्याची सुवर्ण कामगिरी; ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत मिळवले विजेतेपद

बोलून बातमी शोधा

rudransh

ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलने तिसऱ्या ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. रुद्रांक्षने त्याच्या पहिल्याच ऑनलाईन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना लॉकडाऊन असतानाही सरावाची संधी मिळाल्याचा फायदा घेतला.

ठाण्याच्या पठ्ठ्याची सुवर्ण कामगिरी; ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत मिळवले विजेतेपद
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलने तिसऱ्या ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. रुद्रांक्षने त्याच्या पहिल्याच ऑनलाईन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना लॉकडाऊन असतानाही सरावाची संधी मिळाल्याचा फायदा घेतला.

हे वाचलं का? ः  ...म्हणून पुन्हा एकादा रंगली धोनीच्या म्हातारपणाची चर्चा

राष्ट्रीय निवड चाचणीत प्रभावी कामगिरी केलेल्या रुद्रांक्षने 252.9 गुणांचा वेध घेतला. त्याची ही कामगिरी हाओनान यू (चीन) याच्या जागतिक विक्रमापेक्षा 0.1 गुण जास्त नोंदवला.  अर्थात ही कामगिरी रुद्रांक्षने करण्याची पहिलीच वेळ नाही. त्याने युवा निवड चाचणीत बाजी मारताना 253.4 गुणांचा वेध घेतला होता. "दहावीची परिक्षा तसेच लॉकडाऊनमुळे सराव हुकला होता. काही दिवसांपूर्वीच परत सराव सुरु झाला आणि पहिल्याच स्पर्धेत चांगली कामगिरी झाली. चांगला वॉर्मअप झाला," असे रुद्रांक्षने सांगितले. खेलो इंडियानंतर कोणती स्पर्धाच खेळलो नव्हतो. आता आगामी मॅचसाठी तयारी करीत आहे. त्यासाठी चांगला वॉर्मअप झाला. यात जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू होता. त्याचे दडपण नाही म्हंटले तरी येतच असते. त्याचाही सराव झाला

मोठी बातमी नवे आयुक्त ऍक्शनमध्ये ! कोरोनाला थोपवण्यासाठी 'मायक्रो प्लॅनिंग', प्रशासनाला महत्वाचे आदेश

पहिल्या दोन स्पर्धांच्यावेळी माझ्याकडे ऑनलाईन शूटिंग करता येईल अशी लेन नव्हती. त्यानंतर आम्ही घराजवळ एक जागा बघितली होती. तिथे दोन दिवसांसाठी सेट अप केला. त्यासाठी खास परवानगी घेतली. खोपट येथील रेंज त्यादृष्टीने तयार केली. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून खास परवानगी घेतली. आम्ही सर्व काळजी घेत आहोत. तिथे केवळ मला एकट्यालाच सरावाची परवानगी दिली आहे. ही तयार केलेली रेंज एका शाळेच्या बेसमेंटला आहे. तिथे दुसरे कोणीच नसल्यामुळे मला कोणताही त्रास होत नाही, असे रुद्रांक्षने सांगितले.

मोठी बातमी ः Lockdown : मुंबईत 'सीआरपीएफ'ची पथके दाखल होणार?

जिल्हाधिकाऱ्यांकडे सरावाची परवानगी मागताना आम्ही सर्व प्रमाणपत्र सादर केली. आत्तापर्यंत कोणत्या स्पर्धात किती यश मिळवले आहे हे सांगितले. त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धात मी सहा सुवर्णपदके जिंकली आहेत असे सांगितले. त्यांनी आम्हाला सर्व काळजी घेताना नियमांचे कठोर पालन करण्याची सूचना केली. केवळ सरावात ब्रेक होऊ नये, एवढाच सराव करण्याची परवानगी दिली, असेही तो म्हणाला. त्याने आशियाई कुमार विजेता यश वर्धन (250.8) आणि फ्रान्सचा एटीने गेर्मंड (228.5) यांना मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान, यशस्वीनी सिंग देसवाल दहा मीटर एअर पिस्तुलमध्ये अव्वल ठरला. त्याने 243.8 गुणांसह सहज अव्वल क्रमांक मिळवला. त्याने गौरव राणा (240) आणि मनू भाकर (218.6) यांना सहज मागे टाकले.