Ranveer Singh | रणवीरचा जुना फोटो शेअर करून सचिनने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Sachin Tendulkar Share Ranveer Singh Old Photo Give Birthday Wishes
Sachin Tendulkar Share Ranveer Singh Old Photo Give Birthday Wishesesakal
Updated on

मुंबई : बॉलीवूडमधील उत्साही कार्यकर्ता रणवीर सिंहचा आज वाढदिवस (Ranveer Singh Birthday) आहे. रणवीरच्या वाढदिवसानिमित्त भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) एक खास फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या. या फोटोत सचिन तेंडुलकर आणि कॉलेज बॉय रणवीर सिंह दिसत आहेत. दोघांचाही हा खूप जुना फोटो आहे. सचिन तेंडुलकरने शुभेच्छा देण्याबरोबरच रणवीरला हा फोटो कधी काढण्यात आला होता हे सांगू शकतोस का असा प्रश्न देखील विचारला. याचे उत्तर अजून रणवीरने दिलेले नाही. (Sachin Tendulkar Share Ranveer Singh Old Photo Wish Him Happy Birthday)

Sachin Tendulkar Share Ranveer Singh Old Photo Give Birthday Wishes
Malaysia Masters | सिंधूने इंडोनेशिया ओपनचा बदला मलेशिया मास्टर्समध्ये घेतला

सचिन तेंडुलकर आणि रणवीरचा हा जुना फोटो पाहून चाहते देखील जुन्या आठवणीत रममाण झाले. सोशल मीडियावर चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली. सध्याच्या घडीला रणवीर हा बॉलीवूडमधील सर्वात चांगला अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याची नुकतीच प्रदर्शित झालेला जयेशभाई जोरदार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता तो रोहित शेट्टीच्या आगामी सर्कस या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्याला या चित्रपटाकडून चांगल्या अपेक्षा आहेत. त्याला आशा आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करेल.

Sachin Tendulkar Share Ranveer Singh Old Photo Give Birthday Wishes
BCCI | विराट - रोहितवरून इरफान पठाणची बीसीसीआयवर टीका

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. सचिन तेंडुलकर आयपीएल दरम्यान मुंबई इंडियन्सचा मेंटॉर होता. मात्र या आयपीएल हंगामात मुंबईला फारशी कमाल करता आली नाही. ते गुणतालिकेत तळात राहिले. ते प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करू शकले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com