सैफ चॅम्पियनशिपमध्ये भारताचाच दबदबा; ८ व्यांदा विजेतेपद

सैफ चॅम्पियनशिपमध्ये भारताचाच दबदबा; ८ व्यांदा विजेतेपद
Summary

भारताने सैफ चॅम्पियनशिपवर ८ व्यांदा नाव कोरले. भारताच्या विजयासह कर्णधार सुनिल छेत्रीनेसुद्धा मोठी कामगिरी केली आहे.

भारतीय फुटबॉल संघाने सुनिल छेत्रीच्या नेतृत्वाखाली नेपाळला पराभूत करून SAFF चॅम्पियनशिप जिंकली आहे. भारताने नेपाळचा ३-० अशा गोल फरकाने पराभव केला. या विजयासह भारताने सैफ चॅम्पियनशिपवर ८ व्यांदा नाव कोरले. भारताच्या विजयासह कर्णधार सुनिल छेत्रीनेसुद्धा मोठी कामगिरी केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय फूटबॉलमध्ये लिओनेल मेस्सीच्या ८० गोल्सची बरोबरी केली आहे. सुनिल छेत्रीने ४९ व्या मिनिटाला गोल करत ही कामिगिरी केली. सैफ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची आतापर्यंत भारताची कामगिरी सरस राहिली आहे.

भारताने दुसऱ्या हाफमध्ये तिन्ही गोल केले. यात सुनिल छेत्री, सुरेश सिंह आणि सहल अब्दुल समद यांनी गोल नोंदवले. चॅम्पियनशिपच्या सुरुवातीला बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध भारताला बरोबरीत समाधान मानावे लागले होते. त्यानंतर भारताने नेपाळ, मालदीव विरोधात विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली होती. शेवटी पुन्हा एकदा नेपाळला पराभूत करून विजेतेपदावर नाव कोरले.

सैफ चॅम्पियनशिपमध्ये भारताचाच दबदबा; ८ व्यांदा विजेतेपद
भारताला वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर 'ही' गोष्ट महत्त्वाची- गांगुली

भारताचा कर्णधार सुनिल छेत्रीचे आंतरराष्ट्रीय फूटबॉलमध्ये ८० गोल झाले आहेत. लिओनेल मेस्सीच्या गोलची बरोबरी त्याने केली आहे. याआधीच्या सामन्यात छेत्रीने दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना मागे टाकलं होतं. आता मेस्सीला मागे टाकण्यासाठी सुनिल छेत्रीला फक्त एका गोलची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com