
Salman Aga’s Donation Sparks Row After Asia Cup Final
Esakal
Asia Cup Final Ind vs Pak: आशिया कप स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं त्याच्या स्पर्धेतील सर्व सामन्यांचं मानधन भारतीय लष्करासाठी दिलं. याबद्दल सूर्यकुमार यादवचं कौतुक होत आहे. तर दुसऱ्या बाजूला सूर्याची कॉपी करत पाकिस्तानच्या कर्णधाराने त्याचं मानधन भारतानं केलेल्या हल्ल्यात मृत्यू पडलेल्या कुटुंबियांना आणि जखमी झालेल्यांना देण्याचा निर्णय़ घेतलाय. आता यामुळे पाकिस्तानच्या कर्णधाराला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. तू आता दहशतवाद्यांनाच पैसे देणार का असा प्रश्न विचारला जात आहे.