esakal | सानिया मिर्झा ठरली पहिलीच भारतीय टेनिसपटू; पण कशासाठी? 

बोलून बातमी शोधा

Sania-Mirza

फेडरेशन टेनिस स्पर्धेतील आशिया-ओशियाना विभागाच्या हार्ट पुरस्कारासाठी सानिया मिर्झाला नामांकित करण्यात आली आहे. या प्रकारचे नामांकन मिळालेली ती देशातील पहिली टेनिसपटू ठरली आहे.

सानिया मिर्झा ठरली पहिलीच भारतीय टेनिसपटू; पण कशासाठी? 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : फेडरेशन टेनिस स्पर्धेतील आशिया-ओशियाना विभागाच्या हार्ट पुरस्कारासाठी सानिया मिर्झाला नामांकित करण्यात आली आहे. या प्रकारचे नामांकन मिळालेली ती देशातील पहिली टेनिसपटू ठरली आहे.

मोठी बातमी ः ऑलिंपिक समितीचे उपप्रमुख कोझो ताशीमा यांना कोरोनाची लागण

काही वर्षापूर्वी जागतिक दुहेरी क्रमवारीत अव्वल असलेल्या सानियाने फेडरेशन स्पर्धेद्वारे स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन केले होते. प्रथमच फेडरेशन कप प्ले-ऑफसाठी पात्र ठरलेल्या भारतीय संघात सानियाचा समावेश होता. तिने या स्पर्धेत दुहेरीच्या तीन लढती जिंकल्या होत्या. या स्पर्धेतील भारताच्या यशामुळे सानियाचे नामांकन झाले आहे, असे भारतीय टेनिस संघटनेने कळवले आहे. 

मोठी बातमी ः ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना आयपीएलसाठी भारतात खेळण्याची परवानगी मिळणार का?

फेडरेशन स्पर्धेत मी पहिल्यांदा 2003 मध्ये खेळले होते. भारताकडून खेळण्याचा क्षण अजूनही विसरलेले नाही. भारतीय टेनिसच्या प्रगतीत माझा 18 वर्षे सहभाग आहे, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. गेल्या महिन्यातील फेडरेशन स्पर्धा माझ्यासाठी नक्कीच मोलाची होती. आता त्यातील पुरस्कारासाठी नामांकन झाल्याचे समजल्यामुळे मी खूप आनंदीत आहे, असे सानियाने सांगितले.

मोठी बातमी ः लॉकडाऊनमुळे राज्य वूशू स्पर्धा भरली ऑनलाईन

फेडरेशन कपच्या विभागीय स्पर्धेतील कामगिरीनुसार देण्यात येणाऱ्या तीन पुरस्कारासाठी सहा खेळाडू नामांकित आहेत. त्यासाठीचे ऑनलाईन मतदान 1 मे रोजी सुरु होईल. ते 8 मेपर्यंत असेल. सानियाला इंडोनेशियाच्या प्रिस्का मेडेलीन नग्रोहो हीचे आव्हान असेल.