
Sanjay Raut Reacts To Asia Cup Drama Says Public Fooled
Esakal
आशिया कपच्या अंतिम सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सामन्यात पराभवानंतर चिडलेल्या पाकिस्तानी कर्णधारानं बक्षीसाचा चेक फेकून दिला. तर भारतीय संघाने आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री असलेल्या मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. यानंतर नकवी हे ट्रॉफी अन् मेडल्स घेऊन मैदानातून निघून गेले. दरम्यान, या हायव्होल्टेज ड्राम्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही सगळी नाटकं असल्याचं म्हटलंय. तुमच्या रक्तात देशभक्ती होती तर पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरायलाच नको पाहिजे होतं असंही राऊत म्हणालेत.