Shakib Al Hasan : इतिहासातील पहिला टाईम आऊट करणारा शाकिब अल हसन वर्ल्डकपमधून बाहेर

Shakib Al Hasan
Shakib Al Hasanesakal

Shakib Al Hasan : बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने काल क्रिकेटच्या 146 वर्षाच्या इतिहासात जे घडलं नव्हतं ते करून दाखवलं. त्याने श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट केलं. मॅथ्यूज हा क्रिकेट इतिहासातील पहिला टाईम आऊट होणारा खेळाडू ठरला. यामुळे क्रिकेट जगतात उलट सुलट चर्चा सुरू झाला आहेत. दरम्यान, वादाचा केंद्रबिंदू ठरलेला शाकिब अल हसन हा उर्वरित वर्ल्डकपला मुकला आहे.

Shakib Al Hasan
World Cup 2023: क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; अफगाण आता पाकिस्तानात घालणार धुमाकूळ

शाकिब अल हसनच्या डाव्या हाताच्या इंडेक्स फिंगरला दुखापत झाली आहे. ही दुखापत श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यावेळी झाली. सामन्यानंतर त्याच्या बाटोचा एक्सरे काढण्यात आला त्यात फ्रॅक्चर असल्याचे समोर आले. त्यामुळे तो वर्ल्डकपला मुकणार आहे.

बांगलादेश आपला शेवटचा सामना 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळणार आहे. बांगालेदश संघाचे फिजिओ बायजेदुल इस्लाम खान यांनी शाकिबच्या दुखापतीबद्दल माहिती दिली.

ते म्हणाले, 'फलंदाजी करताना सुरूवातीलाच शाकिबच्या बोटावर चेंडू लागला होता. मात्र त्याने तशीच फलंदाजी केली. त्याला फलंदाजी करता यावी यासाठी पेन किलर गोळ्या आणि बोटाला सपोर्टिव्ह टेप लावण्यात आला होता.

Shakib Al Hasan
world cup 2023: प्रसिद्ध अभिनेत्रीनं मोहम्मद शमीला आधी थेट लग्नाची मागणी घातली अन् आता..

ते पुढे म्हणाले की, 'सामन्यानंतर त्याच्या बोटाचा तातडीने एक्सरे काढण्यात आला. त्यात त्याचे डाव्या हाताचे इंडेक्स फिगर फ्रॅक्चर असल्याचे आढळून आले. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कावलाधी लागेल.'

बांगलादेशचा संघ यापूर्वीच वर्ल्डकपच्या सेमी फायनल रेसमधून बाहेर पडला आहे. मात्र बांगलादेशच्या दृष्टीने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पात्र होण्यासाठी उरलेला एक सामना महत्वाचा आहे.

(Sports Latest News)

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com