Shoaib Malik VIDEO : आधी सडकून टीका आता फायनलला गेल्यानंतर शोएबचा नाचून दंगा!

Shoaib Malik VIDEO : आधी सडकून टीका आता फायनलला गेल्यानंतर शोएबचा नाचून दंगा!

Shoaib Malik Pakistan T20 World Cup 2022 : पाकिस्तानने टी 20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. पाकिस्तानची या स्पर्धेत चांगली सुरूवात झाली नव्हती. ते भारताकडून हरले तर झिम्बाब्वेकडूनही पराभव सहन करावा लागला. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकला हरवल्यानंतर पाकिस्तान संघ खरा फॉर्ममध्ये आला. त्यानंतर त्यांनी सेमी फायनलमध्ये बलाढ्य न्यूझीलंडचा 7 विकेट्स राखून पराभव करत फायनल गाठली. पाकिस्तान अनपेक्षितरित्या अंतिम फेरीत गेल्यानंतर आधी संघावर टीका करणारे शोएब मलिक, वकार युनिस, वसिम अक्रमक हे न्यूजरूममध्येच नाचू लागले. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shoaib Malik VIDEO : आधी सडकून टीका आता फायनलला गेल्यानंतर शोएबचा नाचून दंगा!
IND vs ENG : इंग्लंडविरूद्ध सामन्याची 'ही' षटके भारताचा करू शकतात घात

पाकिस्तानने न्यूझीलंडचा 7 विकेट्सनी पराभव केल्यानंतर शोएब मलिक, वकार युनिस, वसिम अक्रमक हे न्यूजरूममध्येच भांगडा करू लागले. इतर सर्व क्रिकेट तज्ज्ञ हे आपापल्या खुर्चीवर बसूनच नाचत होते. मात्र उत्साहित झालेला शोएब मलिक मात्र आपल्या खुर्चीवरून उठून भांगडा करू लागला होता. या सर्व क्रिकेट तज्ज्ञांनी पाकिस्तानचा संघ खराब कामगिरी करत होता त्यावेळी त्यांच्यावर सडकून टीका करत होते. मात्र आता फायनल गाठल्यानंतर हे तज्ज्ञ नाचून दंगा करताना दिसत आहेत.

Shoaib Malik VIDEO : आधी सडकून टीका आता फायनलला गेल्यानंतर शोएबचा नाचून दंगा!
Shaheen Afridi : सेलीब्रेशन करताना आफ्रिदीने घेतली मोठी रिस्क; फायनलला मुकणार...

दरम्यान, शोएब मलिक सध्या आपल्या वैवाहिक जीवनावरूनही चर्चेत आला आहे. त्याचा आणि भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा यांचा कोडीमोड होणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून ऊत आला आहे.

न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी 153 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पाकिस्तानने 3 विकेट्स गमावून शेवटच्या षटकात पार केले. कर्णधार बाबर आझमने 53 धावांची तर मोहम्मद रिझवानने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. मोहम्मद हारिसने 30 धावा करत त्यांना चांगली साथ दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com