Shreyas Iyer IND vs ENG : बदला घ्यावा तर अय्यरनं! तिसऱ्या दिवशी स्टोक्सनं खेळी संपवली चौथ्या दिवशी श्रेयसनं वचपा काढळा

India Vs England Shreyas Iyer Vs Ben Stokes : स्टोक्सच्या कॅचला अय्यरने बुंगाट थ्रो मारून दिलं प्रत्युत्तर
India Vs England Shreyas Iyer Vs Ben Stokes
India Vs England Shreyas Iyer Vs Ben Stokes esakal

India Vs England Shreyas Iyer Vs Ben Stokes : दुसरा कसोटी सामना भारताने 106 धावांनी जिंकला. या कसोटीत भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात 255 धावा केल्या. इंग्लंडसमोर 399 धावांचे आव्हान ठेवले होते.

दरम्यान, या सामन्यात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने पहिल्या डावात 27 धावा करत दुसऱ्या डावात 29 धावा केल्या. खराब कामगिरीमुळे अय्यवर संघातून डच्चू मिळण्याची टांगती तलवार लटकत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात बेन स्टोक्सने अय्यरचा अप्रतिम झेल टिपला होता. याचा बदला अय्यरने चौथ्या दिवशी घेतला.

India Vs England Shreyas Iyer Vs Ben Stokes
Rahul Dravid On Ishan Kishan : आम्ही संपर्कात! राहुलनं इशानबाबत दिली मोठी अपडेट; रोहितसह इतर फलंदाज रणजी खेळणार?

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या. भारतीय संघ मोठी आघाडी घेण्याच्या इराद्यात होता. मात्र शुबमन गिल सोडला तर इतर फलंदाज सेट होऊन बाद झाले. श्रेयस अय्यर दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करत होता. त्याने 52 चेंडूत 29 धावा केल्या होत्या.

अय्यरने गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी रचली होती. या चांगल्या सुरूवातीचा फायदा उचलत अय्यर दुसऱ्या डावात मोठी खेळी करणार असं वाटत होतं. मात्र टॉम हार्टलीच्या चेंडूवर एक मोठा फटका मारून 6 धावांची वसूली करण्याचा अय्यरचा प्रयत्न फसला.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने मागे पळत जात अय्यरचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर त्यांने सेलिब्रेशन करताना अय्यरकडे पाहून काही इशारे केले होते.

India Vs England Shreyas Iyer Vs Ben Stokes
Ind vs Eng : द्विशतक ठोकणाऱ्या यशस्वी जैस्वालला नाही तर 'या' खेळाडूला मिळाला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार

अय्यरने त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही मात्र चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ 399 धावांचा पाठलाग करत होता त्यावेळी बेन स्टोक्स आणि बेन फोक्स यांनी चांगली भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अय्यरने आपल्या जबरदस्त थ्रोने बेन स्टोक्सला 11 धावांवर धावबाद केलं. धावबाद केल्यानंतर अय्यरने स्टोक्ससारखेच सेलिब्रेशन करत त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

अय्यरने बेन स्टोक्सला धावबाद करत भारताची सामन्यावरील पकड मजबूत केली होती. स्टोक्स जर क्रिजवर टिकला असता तर भारता विजय अजून अवघड झाला असता.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com