INDvsNZ : अमेझिंग! रविंद्र जडेजाने घेतलेला 'हा' कॅच एकदा पाहाच! (व्हिडिओ)

Sir-Jadeja_Stunning-Catch
Sir-Jadeja_Stunning-Catch

INDvsNZ : ख्राईस्टचर्च : टीम इंडियातील सध्याचा नंबर एक ऑलराउंडर असलेला रविंद्र जडेजा हा तितकाच जबरदस्त फील्डरसुद्धा आहे. कॅच असो किंवा डायरेक्ट हिट जडेजा सहसा चुकत नाही. त्यामुळेच टीम इंडियाच्या चाहत्यांचा जडेजावर कमालीचा विश्वास आहे.

न्यूझीलंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीवेळी याची प्रचिती पुन्हा आली. जडेजाने एका हातात घेतलेला अफलातून कॅच पाहिल्यानंतर मॅच पाहणारे सगळे अवाक् झाले. 

टीम इंडियाने २४२ धावांचे टार्गेट दिल्यानंतर मैदानात उतरलेल्या किवीज संघाने पहिल्या सत्रात ५ गडी गमावले. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे किवीजच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी लोटांगण घातल्यानंतर तळातील फलंदाजांनी मात्र चांगलेच झुंजवले. कॉलिन डी-ग्रँडहोम, नील वँगर आणि कायले जेमिसन यांनी चिवट फलंदाजी करत न्यूझीलंडला २३५ पर्यंत मजल मारता आली. त्यामुळे भारताकडे फक्त ७ धावांची आघाडी राहिली.

जडेजाने घेतला नील वँगरचा अफलातून झेल

दरम्यान, नील वँगर आणि कायले जेमिसन यांनी नवव्या विकेटसाठी ५१ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. मोहम्मद शमीने ही जोडी फोडत न्यूझीलंडचा हादरा दिला. शमीने टाकलेल्या ७२ व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर वँगरने स्क्वेअर लेगला हवेत शॉट मारला. तो कॅच होईल याची कुणाला कल्पना नसताना जडेजाने हवेत उंच उडी मारत एका हातात हा अफलातून कॅच घेतला. 

जडेजाने घेतलेला कॅच पाहून दोन मिनिटांसाठी स्वत: वँगरही आश्चर्यचकित झाला होता. जडेजाने घेतलेल्या या कॅचसाठी टीम इंडियातील सर्व खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले. 

तत्पूर्वी, जडेजाने १० ओव्हरमध्ये फक्त २२ रन देत रॉस टेलर आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी पॅव्हेलियनमध्ये पाठविले होते. तसेच बी.जे.वॅटलिंगचा एक कॅचही त्याने पकडला होता. 

पहिल्या डावात भारताने २४२ रन केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंड २३५ धावा करू शकली. भारताच्या मोहमंद शमीने ४, जसप्रीत बुमराने ३, जडेजाने २ आणि उमेश यादवने १ विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com