Bajrang Punia : मी आधीच बोललो... क्रीडामंत्री बजरंग पुनियानं पद्मश्री रस्त्यावर ठेवल्यानंतर काय म्हणाले?

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी बजरंग पुनियाच्या पुरस्कार वापसीवर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली
Bajrang Punia
Bajrang Puniaesakal

Anurag Thakur On Bajrang Punia Returning His Padma Shri : भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार कर्तव्य पथावर ठेवला. भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष म्हणून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचा व्यक्ती संजय सिंह यांची निवड झाली.

त्यानंतर आधी साक्षी मलिकने कुस्ती सोडत असल्याचं जाहीर केलं अन् बजरंग पुनियानेही आपला पद्म पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली. याबाबत क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.

Bajrang Punia
Ruturaj Gaikwad : ऋतुराज कसोटी मालिकेला मुकला, अभिमन्यू इश्वरनला मिळणार संधी

अनुराग ठाकूर हे एशियन गेम्समध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडियाच्या सेंटरवर आले होते. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'मी याबाबत आधीच खूप बोललो आहे. आता कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही.'

अनुराग ठाकूर यांनी आज साई सेंटरमधील सिंथॅटिक अथलॅटिक्स ट्रॅकचे उद्घाटन केलं आहे. यावेळी त्यांनी माजी विजेत्या खेळाडूंनी तरूण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप सोडावी यासाठी त्याना मार्गदर्शन करण्याचीही विनंती केली. ठाकूर म्हणाले की, 'आपल्या खेळाडूंनी एशियन गेम्स आणि एशियन पॅरा गेम्समध्ये 100 पेक्षा जास्त पदके जिंकली आहेत. या खेळाडूंची कामगिरी प्रकाशझोतात आली पाहिजे.'

Bajrang Punia
Hardik Pandya : पांड्यानं MI चं टेन्शन वाढवलं! अफगाणिस्तान पाठोपाठ IPL 2024 ला देखील मुकणार?

'मी एशियन गेम्ससाठी खेळाडू रवाना होण्यापूर्वी त्यांना विचारलं होतं की तुम्ही 100 पदकं जिंकणार का त्यावेळी त्यांनी आत्मविश्वास दर्शवला होता. त्यांनी तो आत्मविश्वास खरा देखील करून दाखवला.'

'आपण काही महत्वाच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आपण पहिल्यांदाच थॉमस कप जिंकला. आपल्याला हॉकी, अॅथलेटिक्समध्ये देखील मोठं यश मिळालं आहे. आता त्या चॅम्पियन खेळाडूंनी त्यांचे ज्ञान आणि अनुभव तरूण खेळाडूंशी शेअर करायला हवा.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com