कुंबळेची पुन्हा मुलाखत कशाला?

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मे 2017

लोढा समितीने भारतीय क्रिकेट मंडळास फटकारले

मुंबई/नवी दिल्ली: सरत्या मोसमात चमकदार कामगिरी केलेल्या अनिल कुंबळे यांच्याबरोबर थेट नव्यानेच करार करायला हवा होता. नव्याने प्रशिक्षकपदांच्या मुलाखती कशाला, अशी संतप्त विचारणा लोढा समितीने केली आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट मंडळाची कार्यपद्धती मूर्खपणाची असल्याची टीका केली आहे.

लोढा समितीने भारतीय क्रिकेट मंडळास फटकारले

मुंबई/नवी दिल्ली: सरत्या मोसमात चमकदार कामगिरी केलेल्या अनिल कुंबळे यांच्याबरोबर थेट नव्यानेच करार करायला हवा होता. नव्याने प्रशिक्षकपदांच्या मुलाखती कशाला, अशी संतप्त विचारणा लोढा समितीने केली आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट मंडळाची कार्यपद्धती मूर्खपणाची असल्याची टीका केली आहे.

भारतीय क्रिकेट मंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करायला हवे. ते निर्णयाचे पालन करीत नाहीत. आपल्या पदावर कायम आहेत. त्याच वेळी क्रिकेटपटू आणि मार्गदर्शकांबाबत करारातील छोटे मुद्दे मोठे करीत आहेत. नियमांचे पालन न करण्यासाठी वेगळाच कायदा हवा, असे लोढा समितीचे सचिव गोपाल संकरनारायण यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.

मार्गदर्शकपदासाठी नव्याने अर्ज मागवल्याने संकरनारायण संतापले. ते म्हणाले, कुंबळेला या प्रकारे वागणूक कशी देता? राष्ट्रीय मार्गदर्शकांना या प्रकारे वागतात. त्यांच्याबरोबर एका वर्षाचा करारच हास्यास्पद आहे. राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या कामगिरीचा आढावा प्रत्येक वर्षास घेणेच चुकीचे आहे. एका वर्षासाठी कोण पद स्वीकारणार आहे? मंडळाचे पदाधिकारी हे जाणूनबूजून करीत आहेत. राष्ट्रीय मार्गदर्शकांना काही तुकड्या-तुकड्यांनी दिले जात नाही. नवा करार नक्कीच एका वर्षाचा नको.

कुंबळे खेळाडूंसाठी भांडत आहे. आयसीसीकडूनही त्यांना आता काही मिळत नाही. त्यामुळेच ते नाराज आहेत, असा दावाही त्यांनी केला. भारतीय क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी, "आम्ही प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया केली नसती तरी टीका झाली असती' असे सांगत आहेत.

सेहवाग प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत?
वीरेंद्र सेहवाग भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची शक्‍यता आहे. त्यास अर्ज करण्यास भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. नव्या प्रशिक्षकांबरोबरील करार 2019 च्या विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत असेल, असे सेहवागला सांगितल्याचेही वृत्त आहे. प्रशिक्षकापदाबद्दल कोणत्याही भारतीय पदाधिकाऱ्यांनी संपर्क केला नसल्याचे सेहवागने सांगितले.

ताज्या बातम्या-

Web Title: sprts news cricekt lodha committee and anil kumble