
जयवर्धनेने महिलेचा Video शेअर करत म्हणाला; लाज वाटली पाहिजे सरकारला
नवी दिल्ली : श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात सापडला अतून तेथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून मोठ्याप्रमाणात प्रदर्शने करत आहे. काही ठिकाणी या प्रदर्शनांना हिंसक वळण लागत आहे. काही लोकांनी तर श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे घरच जाळले. घरामोर उभी असलेली गाडी जाळून टाकली. लष्कराने कशीबशी राजपक्षेंचा जीव वाचवला. त्यानंतर राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबियांना लष्कराने त्रिंकोमाली या नौदलाच्या बेसमध्ये लपवून ठेवले आहे. दरम्यान, आपला मायदेश जळताना पाहून आयपीएलमुळे भारतात असलेल्या कुमार संगकारा, महेला जयवर्धने आणि वानिंदू हसरंगा यांनी वेदना व्यक्त केल्या. जयवर्धनेने तर एका महिला आंदोलकांना पोलिसांसमोर मारहाण करतानाचा व्हिडिओ शेअर करत सरकारवर जाळ काढला. (Sri Lanka Violence Mahela Jayawardene Criticize Sri Lanka Government)
हेही वाचा: युवराज सिंगने बॅड पॅचमधील रोहितबाबत केले मोठे वक्तव्य
महिंदा राजपक्षेने राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेत हिंसाचार भडकला होता. त्यात जवळपास 200 लोक जखमी तर 5 लोकांचा जीव गेला होता. त्यात सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराचा देखील समावेश होता. संगकारा राजपक्षेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत म्हणाला की, 'फक्त तुमच्या सर्थकांनी, गुंडांनी आणि लुटारूंनी हिंसा घडवून आणली. हे सर्व शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर हल्ला करण्यापूर्वी तुमच्या ऑफिसमध्ये आले होते.'
हेही वाचा: 'छोटी बच्ची हो क्या'; शिखर धवन - प्रिती झिंटाचा जीममधील VIDEO व्हायरल
याचबरोबर मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेने एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करत 'अशा प्रकारे महिलांशी गैरवर्तनूक सुरू आहे. महिला आंदोलकांना मारहाण केली जात आहे. त्यांना फरफरटत नेले जात आहे. पोलीस फक्त बघ्याची भुमिका घेत आहेत. लाज वाटली पाहिजे सरकारला.'
तर आरसीबीचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाने ट्विट केले की, 'भ्याड आणि घृणास्पद! आज शांततेत आंदोलन करणाऱ्या श्रीलंकन जनतेवर झालेल्या हल्ल्यासाठी हे दोनच शब्द वापरता येतील. अशा प्रकारचे नेतृत्व आमच्या देशात आहे याचा विचार करून मी निराश झालो आहे. मी अशा परिस्थितीत देखील जी माणसं संघर्ष करतायत त्यांच्या सोबत उभा आहे.'
विकेटकिपर निरोशन डिक्वेला सध्या लंकेच्या संघासोबत बांगलादेश दौऱ्यावर आहे त्याने देखील ट्विट करून आपला राग व्यक्त केला. दरम्यान, पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया श्रीलंका दौऱ्यावर येणार आहे. त्यांनी देखील ट्विट करून श्रीलंकेतील परिस्थितीवर आमची नजर असल्याचे सांगितले.
Web Title: Sri Lanka Violence Mahela Jayawardene Criticize Sri Lanka Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..