

Canada | FIFA World Cup 2026
Sakal
FIFA World Cup 2026, Canada vs South Africa : फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा आता रोमांचक वळणावर आली असून नॉकआऊट फेरीला सुरुवात झाली आहे. या फेरीत (Round of 32) रविवारी (२८ जून) यजमान कॅनडाने चित्तथरारक विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत (Round of 16) प्रवेश केला आहे.
रविवारी कॅनडाने दक्षिण आफ्रिकेला १-० अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे या स्पर्धेतील आव्हान संपले आहे. मात्र कॅनडाने पहिल्यांदाच फिफा वर्ल्ड कपमध्ये नॉकआऊटचा सामना जिंकला आहे.