esakal | T20 World Cup: 'हे तर उत्तेजनार्थ बक्षीस'; गावसकरांचे रोखठोक मत
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil-Gavaskar

T20 World Cup: 'हे तर उत्तेजनार्थ बक्षीस'; गावसकरांचे रोखठोक मत

sakal_logo
By
विराज भागवत

भारतीय संघाची घोषणा झाल्यावर गावसकरांची खोचक प्रतिक्रिया

T20 World Cup 2021: विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची (Team India) बुधवारी घोषणा झाली. संघात शिखर धवन (Shikhar Dhawan), युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), पृथ्वी शॉ यासारख्या खेळाडूंना संधी देण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पण त्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे रविचंद्रन अश्विनला (R Ashwin) चार वर्षांनी संघात स्थान मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सध्या इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत (Ind vs Eng Tests) अश्विनला सातत्याने वगळलं जात आहे. पण असे असताना टी२० विश्वचषक संघात स्थान मिळणं हे जरा विचित्रच मानावं लागेल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. याच मुद्द्यावर लिटल मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी आपलं रोखठोक मत मांडलं.

हेही वाचा: T20 WC Squad : अश्विनच्या सरप्राईज एन्ट्री मागचं कारण...

"निवड समितीने रविचंद्रन अश्विनवर विश्वास दाखवला आणि त्याला संघात घेतलं ही बाब खूपच चांगली आहे. पण तितक्यानेच हुरळून जाण्यात अर्थ नाही. अश्विनला १५ खेळाडूंच्या संघात स्थान देण्यात आले आहे. पण त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळते का? हे पाहणं खरं महत्त्वाचं आहे. इंग्लड दौऱ्यावरदेखील त्याला १५ जणांच्या संघात स्थान मिळाले आहे. पण त्यापैकी ११ खेळाडूंमध्ये त्याला संधी दिली जात नाहीये. त्यामुळे टी२० विश्वचषकासाठी अश्विनला संधी देणं म्हणजे एका प्रकारचं उत्तेजनार्थ बक्षीसच म्हणावं लागेल", अशा रोखठोक शब्दात त्यांनी आपलं मत मांडलं.

हेही वाचा: T20 World Cup 2021: Dhoni is Back! BCCIने दिली नवी जबाबदारी!

R Ashwin

R Ashwin

भारताचा माजी कर्णधार धोनीला मार्गदर्शक म्हणून निवडल्याबद्दल गावसकर यांनी आनंद व्यक्त केला. "धोनीला मेंटॉर म्हणून संघासोबत स्थान देणं ही अश्विनला संघात निवडल्यापेक्षाही मोठी बातमी आहे. कारण २००७ आणि २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत संघाला विजय मिळवून देणारा कर्णधार टीम इंडियासोबत ड्रेसिंग रूममध्ये असणं ही खूपच सकारात्मक बाब असेल", असे गावसकर म्हणाले.

हेही वाचा: ICC T20 World Cup : श्रेयस अय्यरवर स्टँडबायची वेळ कुणामुळे?

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविचंद्रन जाडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुन चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर

loading image
go to top