esakal | मुंबईतील T20 क्रिकेट सामन्यांबद्दल झाला मोठा निर्णय

बोलून बातमी शोधा

मुंबईतील T20 क्रिकेट सामन्यांबद्दल झाला मोठा निर्णय

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचं दिसत आहे. बुधवारी राज्यात 63 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत.

मुंबईतील T20 क्रिकेट सामन्यांबद्दल झाला मोठा निर्णय
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - देशात कोरोनाने हाहाकार उडाला असून बुधवारी दिवसभरात तब्बल 3 लाख 80 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 3 हजार 600 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही 1 मेपर्यंत लॉकडाऊन असून तो वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचं दिसत आहे. बुधवारी राज्यात 63 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई क्रिकेट असोसिएशनने मोठा निर्णय घेतला आहे. टी20 मुंबई लीगच्या तिसऱ्या हंगामाचे आयोजन पुढे ढकलण्यात आलं आहे. पुढची नोटीस येईपर्यंत सामने होणार नाहीत असं एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले.

एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील आणि टी20 सामना नियामक समितीचे प्रमुख मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत पत्रक जारी केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, परिस्थितीवर ताण पडू न देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. त्यासाठीच हा निर्णय़ घेतला असून परिस्थिती सुधारल्यावर यावर फेरविचार करू असेही पत्रकामध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा: Corona Update: राज्यात दिवसभरात 61 हजार रुग्णांची कोरोनावर मात

IPL च्या शेड्युलमध्ये मुंबईत सामने नाहीत

आयपीएलने त्यांच्या शेड्युलमध्ये पुढचे सर्व सामने देशातील इतर मैदानात भरवले आहेत. यामध्ये दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरु आणि कोलकाता इथं पुढचे सामने होणार आहेत. यात मुंबईचा समावेश नाही. प्लेऑफ्सचे सामने अहमदाबादच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. कोरोनामुळे प्रेक्षकांशिवाय सामने खेळवण्यात येत आहेत.

गेल्या 24 तासात मुंबईत 4 हजार 966 नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 6 लाख 40 हजार 507 इतका झाला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 65 हजार 589वर आला आहे. रुग्णवाढीचा दरदेखील 1.09 वरून कमी होत 0.93 टक्के इतका झाला आहे.