T20 World Cup साठी टीम इंडिया 6 ऑक्टोबरला होणार रवाना, जाणून घ्या सर्व काही

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला होणार रवाना
T20 World Cup
T20 World Cupakal

T20 World Cup Team India : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ 6 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेली टी-20 मालिका संपल्यानंतर दोन दिवसांनी भारत संघ विश्वचषकापूर्वी तयारी शिबिरात सहभागी होणार आहे. भारत 13 ऑक्टोबरपर्यंत पर्थमध्ये सराव करणार आहे, जिथे ते वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळतील. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध आणखी दोन सराव सामने खेळण्यासाठी ब्रिस्बेनला जातील.

स्टँडबायसह टी-20 विश्वचषक संघातील पाच सदस्यांना ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव नाही. सूर्यकुमार यादव, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, दीपक हुड्डा आणि रवी बिश्नोई असे पाच क्रिकेटर आहेत. त्यामुळे हे सामने त्यांना मेगा स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करतील.

T20 World Cup
Womens Asia Cup 2022 : महिला आशियाई टी-20 चा बांगलादेशात आजपासून थरार

भारत अजूनही दीपक हुड्डा आणि जसप्रीत बुमराह यांच्या फिटनेसबाबत स्पष्टता मिळाली नाही. बुमराह आणि हुड्डा हे दोघेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतून बाहेर पडले आहेत. सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीतून सावरत आहेत. आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर 28 वर्षीय बुमराह गेल्या महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20I साठी परत आला होता. पण एनसीएच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

T20 World Cup
Jasprit Bumrah : टीम इंडियासाठी खुशखबर; बुमराह T20 World Cup खेळणार!

बुमराह टी-20 विश्वचषकातून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही, परंतु त्याच्या खेळण्यावर अजूनही शंका आहे. हुड्डा आणि बुमराह या दोघांच्या दुखापतीचे वृत्त आल्यास चहर आणि मोहम्मद शमी यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत 23 ऑक्टोबरला एमसीजीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल.

T20 World Cup
IND vs SA : बुमराहच्या जागी सिराज, चाहते गांगूलीवर संतापले

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.

अतिरिक्त खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com